फोटो सौजन्य – X
मेजर क्रिकेट लीग सुरु झाली आहे, यामध्ये आज टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध वाॅशिंग्टन सुंदर या दोन संघामध्ये आज सामना पार पडला. या सामन्यामध्ये टेक्सास सुपर किंग्सच्या संघाने सामन्यात धुमाकुळ घातला. या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जच्या फलंदाजाने डावाच्या शेवटच्या षटकात गोलंदाजांना अशा प्रकारे फलंदाजी केली की तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. शेवटच्या षटकात षटकार मारून, सुपर किंग्जच्या फलंदाजाने संघाचा धावसंख्या ८० धावांच्या पुढे नेला आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने ५ षटकांत २ गडी गमावून ८७ धावा केल्या. सुपर किंग्जचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. मार्कस स्टोइनिसला फक्त २ धावा करता आल्या आणि डॅरिल मिशेलला फक्त ६ धावा करता आल्या. यानंतर शुभम आणि डोनोवन फरेरा यांनी आक्रमक फलंदाजी करत वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले.
डोनोवन फरेरा यांनी स्फोटक फलंदाजी करताना फक्त ९ चेंडूत ३७ धावा केल्या, त्यादरम्यान त्यांच्या बॅटमधून ५ षटकार निघाले. फरेरा यांचा जबरदस्त फॉर्म डावाच्या शेवटच्या षटकात दिसून आला, ज्यामध्ये त्यांनी ४ षटकार मारत २८ धावा केल्या. वॉशिंग्टनकडून मिचेल ओवेनने डावातील शेवटचे षटक टाकले. त्याच्या शानदार कामगिरीमुळे डोनोव्हन फरेराला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
Donovan Ferreira was simply unstoppable 💥 He blasted 37 off of just 9 balls at a strike rate of 411.11. Short-lived as it was, his performance was more than worthy of earning him the title Stake Player of the Match. 🏆@StakeIND x @stakenewsindia pic.twitter.com/ybGau9Xdgy
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) July 3, 2025
८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडम संघाला ५ षटकांत ४ गडी गमावून फक्त ४४ धावा करता आल्या. वॉशिंग्टनकडून फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक १८ धावा केल्या. याशिवाय, रचिन रवींद्रने १० धावा केल्या. टेक्सास सुपर किंग्जकडून गोलंदाजी करताना, नांद्रे बर्गरने १ षटकात १२ धावा देऊन सर्वाधिक २ बळी घेतले.