
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
नुकताच भारतामध्ये झालेला महिला विश्वचषकामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी कहर केला. संघाने कमालीची कामगिरी केली आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा विश्वचषक नावावर केला आहे. भारताच्या युवा आणि अनुभवी खेळाडूंसह टीम इंडियाने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा विश्वचषक जिंकणारा संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले होते तर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन भारतीय संघ विश्वविजेता झाला आहे.
याचदरम्यान भारतीय महिला क्रिकेटची स्टार स्मृती मानधना हिच्या लग्नाच्या चर्चा देखील मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. स्मृती मानधना आणि गायक, डायरेक्टर पलाश यांच्याशी ती मागील अनेक वर्षापासून नात्यात आहे. स्मृती मानधना आणि पलाश हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत. त्याचबरोबर स्मृती मानधना आणि पलाश यांचा एक व्हिडिओ विश्वचषक जिंकल्यानंतर सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
IPL 2026 Auction : मुबंई इडियन्ससोबत Arjun Tendulkar नातं तोडणार? आर अश्विनने उघड केले मोठे सत्य
लग्नाच्या चर्चादरम्यान आता सोशल मिडियावर स्मृती आणि पलाशच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये दोघांची नावे लिहिली आहेत त्याचबरोबर दोघांचे फोटो देखील आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी या जोडप्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका पाहिल्याचा आणि लीक झाली आहे दावा केला. स्मृती मानधना, पलाश यांच्या लग्नाची तारीख कधी आहे यासंदर्भात कोणताही खुलासा झाला नाही. त्यांचबरोबर कुटुंबियांनी लीक किंवा लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
Smriti Mandhana’s wedding card leaked online?#smritimandhana #wedding #criket pic.twitter.com/NQKH3c50iS — SportsTiger (@The_SportsTiger) November 13, 2025
वृत्तांनुसार, लग्नाच्या विधी 20 नोव्हेंबरच्या आसपास सुरू होऊ शकतात, जरी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. WBBL सध्या सुरु आहे यामध्ये स्मृती मानधना खेळत नाही आहे तिने तीचे नाव मागे घेतले आहे. फ्रेबुवारी 2026 मध्ये डबल्यूपीचे आयोजन केले जाणार आहे, WPL मध्ये स्मृती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु म्हणजेच आरसीबीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. झालेल्या या विश्वचषकामध्ये स्मृतीची कामगिरी खरोखरच चांगली राहीलेली दिसली.