
T20 World Cup 2026: New Zealand squad announced for the T20 World Cup! The leadership responsibility rests on the shoulders of this player.
New Zealand squad announced for the 2026 T20 World Cup : २०२६ च्या टी-२० विश्वचषका साठी एकामागून एक संघ आपापल्या संघाची घोषणा करत आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघाची धुरा मिचेल सँटनरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सँटनर हा विश्वचषकातील सर्वात अनुभवी खेळाडू असणार आहे, तसेच तो त्याच्या नवव्या आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसले.
हेही वाचा : जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने २०२५ मध्ये शानदारकामगिरी केल्यान त्याला या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. डफीने गेल्या वर्षी तिन्ही स्वरूपात ८१ बळी टिपेल आहेत. तो टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. डफीसोबत लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि अॅडम मिल्ने यांना वेगवान गोलंदाजी आक्रमणात संघाचा भाग असणार आहेत.
वेगवान गोलंदाज जिमी नीशमचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र हे संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी मजबूत करणार आहेत. टिम सेफर्ट यष्टीरक्षक म्हणून संघात असणार आहे. काइल जेमिसनचा राखीव खेळाडू म्हणून समावेश आहे. जेमिसनला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. फर्ग्युसन आणि मॅट हेन्री दोघेही स्पर्धेदरम्यान पितृत्व रजा घेणार आहेत. या काळात जेमिसनचा संघात समावेश होणीयकी शक्यता आहे.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर काय म्हणाले?
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर टी२० विश्वचषकाबद्दल उत्साहित दिसत आहेत. रॉब वॉल्टर म्हणाले की, “विश्वचषक विशेष आहेत आणि भारत हा आधुनिक क्रिकेटचा हृदयाचा ठोका असून यापेक्षा चांगली जागा कमी आहे.” वॉल्टर पुढे म्हणाले की, “या मेगा स्पर्धेसाठी निवडलेला संघ संतुलित आहे. आमच्याकडे उत्तम फलंदाजीची फौज आहे, परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारे दर्जेदार गोलंदाज आहेत आणि तसेच पाच अष्टपैलू खेळाडू आहेत जे सर्वजण काहीतरी वेगळे आणतात. हा एक अनुभवी गट असून खेळाडू उपखंडात खेळण्यासाठी नवीन नाहीत, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.”
हेही वाचा : भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा
न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि युएईसह गट डी मध्ये असणार आहे. संघाचा पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत.
मिशेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सेफर्ट, ईश सोधी. प्रवासी राखीव खेळाडू: काइल जेमीसन.