श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer’s successful comeback : भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. तो जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करीत ८२ धावांची दमदार खेळी केली. अय्यरची न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी निवड झाली आहे, जरी त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्ती सिद्ध करण्यावर अवलंबून आहे. अय्यर व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवने २४ धावा, मुशीर खानने ७३ धावा, यशस्वी जयस्वालने १५ धावा आणि सरफराज खानने २१ धावा केल्या.
मुंबईने प्रथम फलंदाजी करीत हिमाचलविरुद्ध ९ बाद २९९ धावा ३३ षटकांत उभारल्या. प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशने चांगली टक्कर दिली. मात्र या संघाला सात धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ७३ धावा आणि १ बळी घेणाऱ्या मुशीर खानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. हिमाचल प्रदेशकडून पुखराज मान, अंकुश बैस, मयंक डागर यांची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
हेही वाचा : ‘माझ्यासाठी माझा देश पहिले…’, कोण आहे Ridhima Pathak? देशाच्या स्वाभिमानासाठी BPL ला मारली लाथ
राजस्थानविरुद्ध कर्नाटकचा विजय दरम्यान, अहमदाबादमध्ये, कर्नाटकने राजस्थानविरुद्ध ५० षटकांत ७ गडी बाद ३२४ धावा केल्या. कर्णधार मयंक अग्रवाल १०० धावा करून बाद झाला. देवदत्त पडिककल (९१ धावा) फक्त ९ धावांनी शतक हुकला. सलग तीन हंगामात ३०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ अवघ्या १७४ धावांवरच गारद झाला. परिणामी कर्नाटक संघाने तब्बल दीडशे धावांनी विजय नोंदविला.
शुभमन गिल पंजाबकडून गोव्याविरुद्ध खेळला. परंतु मोठी खेळी करण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी त्यांची घरगुती कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र गिल हा अपयशी ठरला. त्याने गोव्याविरुद्ध केवळ दोन चौकाराच्या जोरावर ११ धावाच केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोव्याने पंजाबविरुद्ध सर्वबाद २११ धावा केल्या. विजयी लक्ष्य पंजाबने ३५ षटकांत चार गडी गमवित गाठले.






