मुंबई : गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने विश्वविक्रम केला आहे. हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येमुळे या मैदानाची नोंद गिनीज बुक मध्ये झाली असून याची माहिती बीसीसीआय आणि जय शाह यांनी ट्विट करत दिली आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम हे जगातील सर्वाधिक मोठे स्टेडियम आहे. या क्रिकेट स्टेडियमवर 29 मे रोजी गुजरात आणि राजस्थान यांच्यात झालेला आयपीएल मधील टी २० सामना पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती. या सामन्यात गुजरातने सात विकेट्सनं बाजी मारली होती. या अंतिम सामन्याला 101566 चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
A proud moment for everyone as India creates the Guinness World Record. This one is for all our fans for their unmatched passion and unwavering support. Congratulations to @GCAMotera and @IPL pic.twitter.com/PPhalj4yjI
— BCCI (@BCCI) November 27, 2022
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने ट्वीट करत विश्वविक्रमाची माहिती दिली. बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले की, ‘आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवलं आहे. चाहत्यांचं समर्थानामुळे हे शक्य झालं.’ बीसीसीआयच्या या ट्विटला सेक्रेटरी जय शाहने रिट्विट करत म्हटले की, २९ मे रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्याला 101566 चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सर्व चाहत्यांचं आभार…