Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Rohit Sharma : विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचे काल मुंबईत दणक्यात स्वागत करण्यात आले. काल फॅन्सने मुंबईच्या रस्त्यावर विक्रमी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी, त्यांना डोळ्यात साठवण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी तोबा गर्दी केली होती. आज याच चॅंम्पियन्सचा सत्कार विधान भवनात करण्यात आला. यावेळी मुंबईकर चार खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी रोहितच्या एकंदर वागणुकीतून तो समोरच्याला उत्तर देतो. त्याचबरोबर मुलाखतीत कमीत कमी बोलून आपल्या देहबोलीतून तो उत्तर देत असतो. हाच गुण नेत्यांनी त्याच्याकडून घ्यावा, कारण कमीत कमी बोलून आपल्या देहबोलीने, कामातून उत्तर द्यावे.
रोहितकडून शिकले पाहिजे
एक कॅप्टन म्हणून रोहितने आपली प्रतिभा उभी केली. रोहितने आपल्याला आनंद आणि दु:ख दिलं, वर्ल्ड कपही जिंकत आनंद आणि निवृत्ती घेत दु:खही दिलं. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची यादी आहे ज्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होत नाही त्या यादीत आता रोहितचं नाव गेलं आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव आणि धोनीनंतर रोहित तिसरा कर्णधार ठरला आहे. माझा राजकीय लोकांना एक सल्ला आहे, पत्रकार परिषदेमध्ये कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजमधून उत्तर कसं देता येतं हे रोहितकडून शिकता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रोहितचे जगभरातून कौतुक
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचं जगभरात कौतुक होत आहे. रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं, रोहित एक कॅप्टन म्हणून कसा आहे ते सर्व खेळाडू सांगतात. याचाच धागा पकडत फडणवीसांनी सभागृहात त्याची एक गोष्ट सर्वांना शिकून घ्यायला सांगितली आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी आली आहे. मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधानसभेमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये दिले. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रूपयांची घोषणा केली. विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांचं कौतुक केलं. यावेळी फडणवीसांनी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याची एक गोष्ट सर्व नेत्यांना शिकायला लावली आहे.