IPL 2025: Everyone rejected IPL 2025! 'This' player scored the highest score in 150 years
IPL 2025 : इंग्लंडचा टॉम बँटन याने आयपीएल 2025 च्या लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला होता. परंतु कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. त्याला एकही खरेदीदार सापडला नाही. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास मिळाले नाही. त्यामुळे टॉम बँटन खेळण्याचा परवाना मिळाला नाही. पण, तो खचला नाही. आयपीएल 2025 मध्ये खरेदीदार न मिळालेल्या बँटनने आता सॉमरसेट विरुद्ध काउंटी डिव्हिजन एका सामन्यात खेळताना 150 वर्षातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. वोस्टरशायरविरुद्ध त्याने हा कारनामा केला आहे.
हेही वाचा : CSK vs DC : ‘तो जिंकण्याचा विचार करत नाही..’ : धोनीच्या फलंदाजीवर नवज्योतसिंग सिद्धू बरसला!
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टॉम बँटनने 381 चेंडूंचा सामना करत त्याने 344 धावा केल्या. यामध्ये त्याने 53 चौकार आणि 1 षटकार लगावले. त्याने आतापर्यंत एकूण 496 मिनिटे मैदनावर ठाण मांडून फलंदाजी केली आहे. 344 धावांवर नाबाद राहिलेल्या बँटनसमोर आता तिसऱ्या दिवशी आपली धावसंख्या अजून वाढवण्याचे आव्हान असणार आहे. धावसंख्या 400 धावांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे.
टॉम बँटनने 344 धावा केल्या आहेत. या धावा सॉमरसेटच्या 150 वर्षांच्या इतिहासातील एका फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. टॉम बँटन ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन लँगरचा 342 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. लँगरने 2006 मध्ये सरे विरुद्ध खेळताना धावसंख्या केली होती. त्यानंतर त्याने 1985 मध्ये वॉर्विकशायर विरुद्ध व्हिव्हियन रिचर्ड्सची 322 धावांची धावसंख्या देखील मागे टाकली होती. पण आता टॉम बँटनने या दोघांनाही मागे सोडले आहे. जस्टिन लँगर सध्या आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत.
काल (5 एप्रिल) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईचा आयपीएल 2025 मधील 18 व्या हंगामातील लागोपाठ तिसरा पराभव ठरला आहे. या सामन्यात दिल्लीकडून चेन्नईला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागाला आहे. चेन्नई सुपर किंगने गेल्या दोन सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील खराब कामगिरीचे प्रदर्शन कायम राखले आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमावून 183 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून केएल राहुलने 51 चेंडूत 77 धावा केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात चेन्नई सुपर किंग्स संघ 5 गडी गमावत 158 धावाच करू शकला. चेन्नईकडून विजय शंकरने 54 चेंडूत 69 धावा केल्या, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.