CSK vs DC : काल (५ एप्रिल) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा २५ धावांनी पराभव केला. चेन्नईने गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील हारकिरी केलेली दिसून आली. आयपीएल 2025 मधील चेन्नई सुपर किंग्सचा हा लागोपाठ तिसरा पराभव ठरला आहे. तर आयपीएलच्या 18 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत या विजयासह अपराजित राहिला आहे. अक्षर पटेलने कुणाची डाळ शिजू दिलेली नाही. तसेच चेन्नईच्या पराभवाने चाहते निराश झाले असून या पराभवाला धोनी जबाबदार असल्याचे बोलले जाता आहे. इतकेच नाही तर क्रिकेट समालोचक यानी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने देखील धोनीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये, या हंगामातील 17 वा सामना काल(5 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. यादरम्यान दिल्लीने चेन्नई संघाचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर संघासमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीकडून केएल राहुलने सर्वाधिक 77 धावांची खेळी साकारली.
प्रतिउत्तरात 184 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून केवळ 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागाला. या हंगामात चेन्नईचा घरच्या मैदानावरील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी आरसीबीने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नई संघाकडून विजय शंकरने 69 धावांची अर्धशतकी खेळी केली परंतु ती विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. या सामन्यात धोनीला बऱ्याच दिवसांनंतर 11व्या षटकात फलंदाजीची संधी मिळाली होती. परंतु, धोनीला मात्र बेस्ट फिनिशरचा रोल पूर्ण करायला जमले नाही.
ज्यावेळी धोनी मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला 56 चेंडूत 110 धावांची गरज होती. अशा स्थितीत तो शानदार फलंदाजी करेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा होती. मात्र त्याने निराश केले. धोनी मैदानात आल्यानंतर रनरेटमध्ये कोणतीही वाढ झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे चेन्नईला आपल्याच घरच्या मैदनावर पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व प्रकारानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचन पॅनलमध्ये बसलेल्या नवज्योत सिंग सिद्धूने धोनीच्या फलंदाजीला बोल लावले.
हेही वाचा : SRH vs GT : एसआरएचस गिलच्या गुजरातचे आव्हान परतून लावणार? आज रंगणार महामुकाबला..
नवज्योतसिंग सिद्धूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘जिंकण्याआधी जिंकण्याचा इरादा असायला हवा. आम्हाला षटकात 17 धावा करायच्या आहेत, पण असे असून देखील तुम्ही एकेरी धावा घेत आहेत. यामुळे संघाचे काही चांगले होणार नाही. धोनी इथून जिंकण्याचा विचार करत असेल, असे मला दिसत नाहीये.’