Two Time Olympic Medalist PV Sindhu has Laid The Foundation for Starting Her Sports Academy in Visakhapatnam
PV Sindhu Sports Center Visakhapatnam : भारतासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने विशाखापट्टणममध्ये स्वतःची क्रीडा अकादमी सुरू करण्याचा पाया घातला आहे. ‘पीव्ही सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सलन्स’चा भूमिपूजन सोहळा गुरुवारी विशाखापट्टणममधील अरिलोवा जंक्शन येथे पार पडला. पीव्ही सिंधूने तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आज पार केला, अनेक होतकरू खेळाडूंसाठी क्रीडा अकादमी सुरू करण्याचा तिचा मानस होता. या अकादमीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून विविध खेळांमध्ये युवा खेळाडू तयार केले जाणार आहेत. आंध्र प्रदेश सरकारने या प्रशिक्षण केंद्रासाठी सिंधूला २ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
पीव्ही सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, तर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. नवीन क्रीडा अकादमीची पायाभरणी केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, विझागमधील लोकांसाठी ही अकादमी सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. या केंद्रासाठी मला विशाखापट्टणमपेक्षा चांगली जागा कदाचित सापडली नसती. येथे अनेक खेळाडू प्रशिक्षण घेतील याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांना प्रत्येक खेळात सराव करता येईल आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षकही उपलब्ध करून देण्यात येतील.
माझे स्वप्न पूर्ण झाले
पीव्ही सिंधू पुढे म्हणाली की, अशी अकादमी निर्माण करणे हे तिचे नेहमीच स्वप्न होते, जिथे युवा खेळाडू जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांकडून पाठिंबा मिळवून त्यांचे सर्वोत्तम देऊ शकतील. सिंधूच्या म्हणण्यानुसार, हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून येथे तातडीने निर्णय घेऊन खेळाडूंची नवी पिढी तयार केली जाईल. सिंधू ही वर्ल्ड चॅम्पियन राहिली असून ती तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे. पीव्ही सिंधूच्या टीमने असेही सांगितले की, हा प्रकल्प तिच्या खूप जवळचा आहे आणि याद्वारे ती क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यास कटिबद्ध आहे.
हे केंद्र खेळाडूंची युवा पिढी घडवण्यात यशस्वी ठरेल
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रीनको ग्रुपने सिंधूला पाठिंबा दिला आहे. ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ग्रीनकोसोबतची भागीदारी आणि गोपी अंकल यांच्या सहकार्यामुळे हे केंद्र खेळाडूंची युवा पिढी घडवण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे. पीव्ही सिंधूची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याची कबुली तिने दिली आहे. पीव्ही सिंधूने तिच्या यशस्वी कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
पॅरिस आॅलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून पीव्ही सिंधू पार पाडली भूमिका
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने ११७ ऍथलीट्सची तुकडी पाठवण्यात आली होती. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना भारताचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यामध्ये २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा ते दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांचा समावेश असणार आहे. हे दोन खेळाडू हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.