Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने भारतीय नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 07:03 PM
बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू (Photo Credit- X)

बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू
  • सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय
  • भारताकडूनही सकारात्मक प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये आलेली कटुता आता दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने भारतीय नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्याची घोषणा केली. डिसेंबर २०२५ पासून या सेवांवर बंदी घालण्यात आली होती.

सत्तापालट आणि राजनैतिक बदलाची नांदी

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) प्रमुख तारिक रहमान यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांनी व्हिसा सेवांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार भारतासोबतचे संबंध लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी उत्सुक असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.

सर्व श्रेणीतील व्हिसा सेवा पूर्ववत

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासूनच बांगलादेश उच्चायोगातील कॉन्सुलर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आता भारतीय नागरिकांना पर्यटन, वैद्यकीय आणि इतर सर्व श्रेणीतील व्हिसा सहज उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी केवळ व्यावसायिक आणि वर्क व्हिसावर मर्यादित सवलत होती, परंतु आता सर्व निर्बंध अधिकृतपणे उठवण्यात आले आहेत. दक्षिण आशियाई राजकारणात आणि आर्थिक बाबतीत भारताचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची जाणीव ‘बीएनपी’च्या नेतृत्वाला असल्याचे कूटनीतिक सूत्रांचे म्हणणे आहे.

‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?

भारताकडूनही सकारात्मक प्रतिसाद

बांगलादेशच्या पुढाकारानंतर भारतानेही मैत्रीचा हात पुढे केला आहे. गुरुवारी सिलहटमध्ये भारताचे वरिष्ठ कॉन्सुलर अधिकारी अनिरुद्ध दास यांनी सूचक विधान केले. “नवी दिल्ली लवकरच बांगलादेशी नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा बहाल करण्याच्या तयारीत आहे,” असे त्यांनी नमूद केले. डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशातील भारतविरोधी निदर्शने आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे भारताने व्हिसा सेवा मर्यादित केल्या होत्या. तत्कालीन युनूस सरकारने भारतविरोधी भावना रोखण्यासाठी ठोस पावले न उचलल्याने दोन्ही देशांमधील दरी वाढली होती.

पंतप्रधान तारिक रहमान यांचा पहिला परदेश दौरा भारत?

बांगलादेशचे पंतप्रधान आपल्या पहिल्या अधिकृत परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करतात, अशी जुनी परंपरा आहे. गेल्या वर्षी महंमद युनूस यांनी चीनला भेट देऊन ही परंपरा मोडली होती. मात्र, तारिक रहमान यांच्या शपथविधीला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थिती लावून भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण पत्रही रहमान यांना सोपवले आहे. त्यामुळे तारिक रहमान आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी भारताची निवड करून नवीन अध्यायाची सुरुवात करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

Web Title: Bangladesh resumes visa services for indians tariq rahmans big decision as soon as he came to power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • Tariq Rahman
  • World news

संबंधित बातम्या

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का
1

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
2

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 
3

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?
4

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.