Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

राज्यातील कुख्यात गुन्हेगारांसाठी आता एक विशेष 'हाय-सिक्युरिटी जेल' (High-Security Jail) उभारले जाणार आहे. या कारागृहाचे स्वरूप ब्रिटीश काळातील 'कालापाणी' शिक्षेसारखे अत्यंत कठोर असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 21, 2026 | 09:30 PM
'या' राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल (Photo Credit- X)

'या' राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर!
  • ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल
  • ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा
बिहारमधील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी नितीश कुमार सरकारने एक अत्यंत मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील कुख्यात गुन्हेगारांसाठी आता एक विशेष ‘हाय-सिक्युरिटी जेल’ (High-Security Jail) उभारले जाणार आहे. या कारागृहाचे स्वरूप ब्रिटीश काळातील ‘कालापाणी’ शिक्षेसारखे अत्यंत कठोर असेल, अशी माहिती बिहारचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री सम्राट चौधरी यांनी विधानसभेत दिली आहे.

डोंगरदऱ्यात असेल कारागृह; तंत्रज्ञानाचाही प्रवेश निषिद्ध

राज्य सरकारने या विशेष कारागृहासाठी एक आगळावेगळा आराखडा तयार केला आहे. या जेलचे वैशिष्ट्य म्हणजे हे कारागृह अशा डोंगराळ भागात बांधले जाईल, जिथे पोहोचण्यासाठी केवळ एकच रस्ता असेल. यामुळे कैद्यांना पळून जाणे किंवा बाहेरील व्यक्तींना तिथे पोहोचणे अशक्य होईल. या परिसरात मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटची कोणतीही सुविधा नसेल. यामुळे गुन्हेगारांना जेलमधून टोळ्या चालवणे किंवा गुन्हेगारी कट रचणे शक्य होणार नाही. या जेलमध्ये ठेवल्या जाणाऱ्या कैद्यांचा बाहेरील जगाशी कोणताही संपर्क राहणार नाही. सध्या भागलपूर जेलमध्ये कडक सुरक्षा असली, तरी ही नवी जेल अत्याधुनिक आणि अधिक कठोर असेल.

High alert in Delhi : पुन्हा दहशतवादी स्फोटाचा इशारा! लाल किल्ला आणि देशातील प्रमुख मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

‘कालापाणी’ म्हणजे नक्की काय?

गृहमंत्री सम्राट चौधरी यांनी या जेलची तुलना ‘कालापाणी’ शिक्षेशी केल्याने या शब्दाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटीश काळात स्वातंत्र्यसैनिकांना मुख्य भूमीपासून दूर अंदमान-निकोबार येथील ‘सेल्युलर जेल’मध्ये धाडले जात असे. चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या जेलमधून पळून जाणे अशक्य होते. तिथे कैद्यांना कोल्हू चालवणे, नारळाच्या काथ्यापासून दोरखंड बनवणे यांसारखे अमानवीय कष्ट करावे लागत. नियम मोडल्यास चाबकाचे फटके आणि बेड्या ठोकल्या जात. याच धर्तीवर, बिहारमधील नवीन जेलमध्ये गुन्हेगारांना एकांतवासाची आणि कठोर श्रमाची शिक्षा दिली जाईल.

सर्व कारागृहांचे होणार ‘ऑनलाईन मॉनिटरिंग’

केवळ नवीन जेलच नाही, तर बिहारमधील सर्व विद्यमान कारागृहांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

१. CCTV पाळत: राज्यातील सर्व जेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे थेट मुख्यालयाशी जोडले जातील, ज्यामुळे त्यांचे ऑनलाईन मॉनिटरिंग शक्य होईल.

२. डिजिटल रेकॉर्ड: कैद्यांना कोण भेटायला आले, किती वेळ चर्चा झाली, याचा संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड ठेवला जाईल.

३. कैद्यांचे शिक्षण: गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी कैद्यांच्या शिक्षणावरही भर दिला जात असून, सध्या मोठ्या संख्येने कैदी जेलमध्ये शिक्षण घेत असल्याचा दावा सरकारने केला आहे.

बिहार सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कुख्यात टोळ्यांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारीमुक्त बिहारच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ऐन फेब्रुवारीत दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा; तामिळनाडू, केरळमध्ये पावसाचा अंदाज…

Web Title: High security jail to be set up in this state punishment will be like kalapani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • bihar
  • CM Nitish Kumar
  • india
  • Jail

संबंधित बातम्या

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी
1

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 
2

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Kitchen Appliances : किचनसाठी स्मार्ट सोल्यूशन! INALSA ने आणला ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर, किंमत फक्त…
4

Kitchen Appliances : किचनसाठी स्मार्ट सोल्यूशन! INALSA ने आणला ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.