
Use of cutting-edge technology to prevent malpractices in Mahatet exam: Exams to be held across the state on November 23
पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) २०२५ चे आयोजन येत्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून, या परीक्षेसाठी एकूण १ हजार ४२३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याच बरोबर वर्षातून दोनदा परीषा होणार असून, पुढील साहा महीन्यात मे किंवी जुन महिन्यात परिक्षाहोउ शकते. पत्रकार परिषदे मध्ये अशी माहीती नंदकुमार बेडसे यानी दिली.
हेही वाचा : IND VS PAK : “आम्ही ज्योतिषी नाही…” पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ विषयावर BCCI का भडकली?
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण ४ लख ७५ हजार ६६९ परीक्षार्थींनी नावनोंदणी केली आहे. पेपर १ – २ लाख ३ हजार ३३४ परीक्षार्थी, पेपर २ – २ लाख ७२ हजार ३३५ परीक्षार्थी पेपर १ साठी ५७१ तर पेपर २ साठी ८५२ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी यावेळी दिव्यांगाची कठोर तपासनी केली आहे. एचएचएमडी, बायोमेट्रिक व फेस रिकग्निशन तपासणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक पडताळणी, सीसीटीव्ही मार्फत लाइव्ह मॉनिटरिंग सर्व परीक्षा कक्ष, फोटो दृश्य ऐतिहासिक पडताळणी तंत्र या वर्षी प्रथमच फोटो पहा या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. दृश्य कनेक्ट करा केंद्रांना हॉटलाईन सुविधा प्रत्येक केंद्रसंचालकाला परीक्षा परिषद व विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन सुविधा उपलब्ध आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन परीक्षेबाबत विविध यूट्यूब चॅनेल्स, सोशल मीडिया व माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे लक्षात घेता, परिषदेनं परीक्षार्थींना आवाहन केले आहे की अधिकृत www.mscepune.in, mahatet.in, वेबसाइटवरीलच सूचनांवर विश्वास ठेवा.
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : ‘यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही…’, अजिंक्य रहाणेचा गंभीरच्या धोरणावर निशाणा
परीक्षा वर्ष – परीक्षार्थी – प्रात्र परीक्षार्थी – टक्केवारी
२०१९ – ३४३२८३ – ९२०५ – २.६८
२०२१ – ४६८६७८ – १७३२४ – ३.७०
२०२४ – ३३००७४ – १११७१ – ३.३८
२०२५ – ४७५६६९ – – – –