अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
Ajinkya Rahane criticizes Gambhir’s policy : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गंभीर आणि त्याच्या संघासमोर अनेक आव्हान असताना त्यांना असंख्य प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागत आहे. दरम्यान, आता माजी फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघ व्यवस्थापनाला क्रमांक ३ च्या फलंदाजीच्या स्थानाशी अतिरेकी छेडछाड करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : ‘कधीकधी तर तो एक अजेंडा वाटतो’ गंभीरवरील टीकेवर कोटक सितांशू यांचे भाष्य
भारतासाठी अनेक वर्षांपासून क्रमांक ५ वर फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने क्रमांक ३ च्या फलंदाजासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. कारण गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून, भारतीय व्यवस्थापनाने साई सुदर्शन, शुभमन गिल, करुण नायर आणि आता वॉशिंग्टन सुंदर यांना क्रमांक ३ वर पाठवण्याचे प्रयत्न केले आहेत. वास्तविक पाहता, पुजाराच्या निवृत्तीनंतर किंवा संघातून बाहेर पडल्यानंतर, निवडकर्त्यांना या स्थानावर कायमस्वरूपी फलंदाज शोधण्यात अपयश आले आहे.
याबाबत, अजिंक्य रहाणेने रविचंद्रन अश्विनच्या “आश की बात” या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “या स्थानावर विशिष्ट तयारीची आवश्यकता असते. यामध्ये सतत बदल करून प्रभुत्व मिळवता येत नसतो. मी येथे साई सुदर्शनचा उल्लेख करणार आहे. त्याने चांगली कामगिरी केली, त्याने ८७ आणि ३९ धावा केल्या आहेत.”
तसेच रहाणे पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरता तेव्हा तुम्हाला वेगळ्या कौशल्याची आवश्यकता असते. तर ६ आणि ७ क्रमांकासाठी वेगवेगळ्या गुणांची आवश्यकता असते. वाशी हा एक उत्तम खेळाडू आहे. तो अविश्वसनीयपणे प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप गोंधळात टाकणारे असणार आहे. त्याने याचा विचार करायला हवा. माझा विश्वास आहे की वाशी हा एक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे.” असे देखील रहाणे म्हणाला.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व..
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, “जर वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचे असेल तर वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकअसणार आहे. तसेच, व्यवस्थापनाने त्याला अधिक वेळ देणे देखील गरजेचे आहे. खालच्या क्रमाने फलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या कौशल्याची आवश्यकतेची गरज असते. वॉशिंग्टन सुंदर असो किंवा साई, कोणत्याही खेळाडूला सुरक्षा प्रदान करणे गरजेचे असल्याचे देखील गरजेचे आहे.”






