Administration takes action against Padma Shri Olympian Mohammad Shahid's house! House demolished by bulldozer; What is the real reason?
Administration’s bulldozer action in Varanasi : रविवारी, म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये रस्ता रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत बुलडोझरचा वापर करण्यात आला. याची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. पोलिस लाईन ते कचरी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली असून या दरम्यान अनेक घरे आणि दुकाने जमीनदोस्त केली गेली आहेत. या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हॉकी खेळाडू मोहम्मद शाहिद यांच्या घरावर करण्यात आली आहे. त्यांचे घर जेसीबीने पाडण्यात आले आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मोहम्मद शाहिद हे एक प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू होते ज्यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात त्यांच्या वेग आणि उत्कृष्ट खेळाने स्वतःची वेगळी अशी छाप पाडली आहे. ते भारतीय हॉकी संघाचे स्टार सदस्य राहिले आहेत. खेळाप्रती असलेल्या समर्पणासाठी आणि कौशल्यासाठी भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. तथापि, २०१६ मध्ये मोहम्मद शाहिद यांचे निधन झाले.
प्रशासनाकडून ही मोहीम रविवारी सकाळी १२:३० वाजता सुरूकरण्यात आली. प्रशासनाकडून परिसरात २०० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्यात तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस, आरएएफ (रॅपिड अॅक्शन फोर्स) आणि दंगल नियंत्रण वाहने यांचा समावेश देखील होता. व्यापक सुरक्षा व्यवस्थेत, कचनार शहीद मझारची भिंत, दयाम खान मशिदीजवळील बांधकाम आणि अनेक दुकांनावर कारवाई करून ते पाडण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, रस्ता रुंदीकरण प्रकल्पांतर्गत रहिवाशांना आधीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना स्वेच्छेने बांधकाम काढून टाकण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. हा प्रकल्प सिंधुरा ते कचरी गोलघर चौकापर्यंत सुमारे ३०० मीटरच्या परिसरात राबविण्यात येत आहे. जिथे ६० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे.
हेही वाचा : BCCI कडून निवड समितीत मोठे बदल! प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
७१ बाधित व्यक्तींना एकूण ३५.२ दशलक्ष भरपाई देखील देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी, याच प्रकल्पांतर्गत अंदाजे ३० ते ४० दुकाने आणि घरांवर कारवाई करून ती पाडण्यात आली होती. तथापि, अनेक रहिवाशांनी वेळेत बांधकाम हटवण्यात अपयशी ठरल्यामुळे, प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागल्या आहेत.