विजय मल्ल्या : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bengaluru) या हंगामाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्या 8 सामन्यात 7 पराभवांना सामोरे जावे लागले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या, पण या संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम उत्साह दाखवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने खराब सुरुवातीतून सावरले आणि सलग 6 सामने जिंकले. त्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. विजय मल्ल्याने (Vijay Mallya) एक सोशल मीडियावर पोस्ट केली यामध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे अभिनंदन केले आहे.
विजय मल्ल्याची सोशल मीडिया पोस्ट
विजय मल्ल्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यामध्ये त्याने आरसीबीचे अभिनंदन केले आहे. यामध्ये तो म्हणाले की, “पहिल्या चारमध्ये पात्र ठरल्याबद्दल आणि IPL प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल RCB चे हार्दिक अभिनंदन. निराशाजनक सुरुवातीनंतर उत्कृष्ट दृढनिश्चय आणि कौशल्याने विजयी गती निर्माण केली आहे. ट्रॉफीच्या दिशेने पुढे आणि वरच्या दिशेने.
Heartiest congratulations to RCB for qualifying in the top four and reaching the IPL playoffs. Great determination and skill have created a winning momentum after a disappointing start. Onward and upward towards the trophy.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 18, 2024
आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा पोहोचणारा चौथा संघ बनला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि चाहत्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र यानंतर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.