फोटो सौजन्य - मीडिया
विनेश फोगाटची निवृत्तीची घोषणा : विनेश फोगाट हे नाव मागील दोन दिवसांपासून जगभरामध्ये प्रचंड चर्चेत आहे. ६ ऑगस्ट रोजी तिने ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. विनेश फोगाटने एकही सामना पराभूत न झालेली जपानची विश्वविजेती आणि ऑलिम्पिक चॅम्पियन युई सुसाकी हीचा पहिल्या फेरीमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता, आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की, ती कोणत्या स्तराची कुस्तीपटू आहे ते. त्यानंतर तिने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये जागतिक क्रमावरीमध्ये टॉप १० मध्ये असलेल्या कुस्तीपटूंना पराभूत करून जगभरामध्ये हाहा:कार माजवला. तिचं कौतुक फक्त भारतीयांनीच नाही तर जगभरामध्ये होऊ लागले दिग्गज चॅम्पियन सुद्धा तिची वाहवाह करत होते.
७ ऑगस्टचा दिवस तिच्यासाठी आयुष्यातील काळा दिवस असेल असे कोणास ठावूक? ७ ऑगस्टच्या सकाळी जगभरामध्ये बातमी पसरते की, विनेश फोगाटला गोल्ड मेडल मॅचमधून बाहेर काढण्यात आले आहे. या बातमीचा धक्का फक्त खेळाडूंचा नाही तर संपूर्ण भारतीयांना लागला आहे. त्यानंतर अतोनात प्रयत्न करूनही निर्णय मागे घेण्यात आला नाही. आता ८ ऑगस्ट रोजी सकाळी विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिने तिच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करून कुस्तीमधून निवृत्तीची माहिती दिली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आहे आणि मी हरली आहे माफ कर मला. तुझं स्वप्न आणि माझी हिम्मत सगळ तुटलं आहे आता ताकद नाही राहिली माझ्यामध्ये.
अलविदा कुस्ती २००१-२०२४
मी तुमच्या सगळ्यांची नेहमीच तरुणी राहील.
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
तिच्या या पोस्टमुळे अनेकजण भावूक झाले आहेत. अनेकजण सोशल मीडियावर तिच्याबद्दल भावूक पोस्ट शेअर करत आहेत. विनेश फोगाटने आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधत्व केलं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती तिच्या पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापतीमुळे तिला ऑलिम्पिकमधील बाहेर व्हावे लागले आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती तिच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यामुळे ती बाहेर झाली. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिने तिची वजन गट बदलला आणि दमदार तयारी करून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. परंतु नशिबाने सुरुवातीला साथ दिली आणि शेवटच्या सामन्यात काळा दिवस दाखवला.