फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
चेन्नईच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने चेपॉकमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर १७ वर्षांमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केले. या सामन्यांमध्ये अनेक पाहण्यासारखे क्षण होते. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. शुक्रवार, २८ मार्चची रात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची होती. आयपीएल २०२५ च्या ९व्या सामन्यात, आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी पराभव केला . १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, बेंगळुरू संघाला चेपॉकचा किल्ला तोडण्यात यश आले आहे. संघाच्या या विजयानंतर स्टार खेळाडू विराट कोहलीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
सामना संपल्यानंतर किंग कोहली ड्रेसिंग रूममध्ये नाचताना दिसला. यावेळी, त्याने काही अद्भुत नृत्याच्या हालचाली देखील दाखवल्या, ज्याचा व्हिडिओ आरसीबीने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.
𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗦𝘁𝗮𝗿𝘁! 🫡
A win brought to you by little invaluable contributions from everyone, summed up perfectly in the dressing room. 👏
Focus now shifts to our first HOME game against GT.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #CSKvRCB pic.twitter.com/xao9GD3eSN
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 29, 2025
व्हिडिओमध्ये विराट कोहली व्यतिरिक्त, आरसीबीचे इतर खेळाडू देखील या विजयाचा आनंद घेताना दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता-
विराट कोहली फलंदाजीने फारसा प्रभावित करू शकला नाही, परंतु क्षेत्ररक्षणादरम्यानचा त्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो आरसीबीच्या नेतृत्व गटाचा एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणूनच तो कर्णधार रजत पाटीदारला खूप मदत करत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर १९६ धावा केल्या, या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान सीएसके निर्धारित २० षटकांत केवळ १४६ धावाच करू शकले. १७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आरसीबीने त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव केला.
सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर, आरसीबी संघ आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर आरसीबीने ४ गुण मिळवले आहेत आणि सध्या २.२६६ च्या नेट रन रेटसह टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर, एलएसजी संघ पॉइंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज संघ +०.५५० च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सीएसकेच्या पराभवाचा फायदा दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर संघांना झाला. तिन्ही संघ त्यांच्या स्थानावरून एका स्थानाने पुढे सरकले आहेत.