IND vs NZ: 'King Kohli' fails in 300th ODI: Glenn Phillips takes an amazing catch in the air; Watch the video
दुबई : दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळवला जात आहे. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना आहे. भारताने मागील दोन्ही सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंड संघाने देखील आपल्या दमदार खेळाच्या जोरावर उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारतीय तारांकित खेळाडू विराट कोहलीसाठी हा सामना खूप विशेष आहे. कारण, हा त्याचा 300 वा एकदिवसीय सामना आहे. परंतु, सामन्यात त्याला आपली छाप पाडण्यात अपयश आले. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने विराटचा चित्याच्या वेगाने हवेत उडी घेत अप्रतिम झेल पकडला आणि विराट कोहलीचा डाव संपुष्टात आला. सध्या ग्लेन फिलिप्सने पकडलेला उत्कृष्ट झेल सर्वांचा चर्चेचा विषय ठरला आहे.
दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली 14 चेंडूत केवळ 11 धावा करून माघारी परतला आहे. मॅट हेन्रीने विराट कोहलीची विकेट घेतली. पण या विकेटमध्ये ग्लेन फिलिप्सचे योगदान सर्वांच्या लक्षात राहणारे आहे. मॅट हेन्रीने टीम इंडियाच्या डावातील 7 वे षटक ताकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉट खेळला खरा आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या दिशेने चेंडू हवेत गेला. त्यावेळी फिलिप्सने हवेत सुर मारत अप्रतिम झेल पकडला. हा झेल बघून मैदानावरील खेळाडूंस प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. क्षणात जे घडलं त्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे विराट कोहलली परतीचा रस्ता पकडावा लागला.
खेळाडूंचे दमदार क्षेत्ररक्षण न्यूझीलंड संघाची जमेची बाजू राहिली आहे. याची प्रचिती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ग्लेन फिलिप्सने आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे दर्शन दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ग्लेन फिलिप्सने अप्रतिम झेल घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्धही असाच झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या सामन्यात विल्यम ओ’रुर्कच्या एका चेंडूला मोहम्मद रिझवानने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने टोलवला होता. तेव्हा ग्लेन फिलिप्सनेही हवेत उडी घेत हा फटका रोखला आणि सुंदर झेल घेतला होता. यावेळीही देखील ग्लेन फिलिप्सने आपला करिश्मा दाखवत अवघ्या 0.61 सेकंदात विराटचा झेल पकडला.
हेही वाचा : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारताविरुद्ध ओकले विष, म्हणाला ‘तुमचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवू’
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण करण्यात आले. टीम इंडियाने पहिल्या 10 षटकात 3 विकेट गमावून केवळ 37 धावा केल्या होत्या. त्यांतर मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. आता भारताच्या 172 धावा झाल्या असून 4 विकेट्स गेल्या आहेत. अक्षर पटेल ४२ धावांवर बाद झाला तर श्रेयस अय्यर 98 चेंडूमध्ये 79 धावा करून माघारी परतला आहे.