त्यानंतर सर्व काही समोर येईल! पराभवाची झळ अजूनही कायम, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने दिले भारताला 'हे'आव्हान..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs PAK : क्रिकेट जगतात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार रंगला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. परंतु भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्याने भारताचे सामने दुबईमध्ये खेळवण्यात येत आहेत. पाकिस्तानला यजमानपदाची संधी मिळाल्यापासून पाकिस्तान क्रिकेटचा आवाज चढाच दिसून येत होता. परंतु, भारताकडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानची हवाच फुस्स झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटर केवळ त्यांच्या संघावरच टीका करत नाहीत तर ते भारताविरुद्धही गरळ ओकतांना दिसत आहेत. अशातच पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटने भारतीय संघाला थेट एक आव्हानच दिलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे साखळी सामने बघता दुबईत खेळवल्या गेलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामध्ये भारतीय संघाने आपला दबदबा दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले होते. चारीमुंड्या चीत केले होते, त्यामुळे पाकिस्तान संघाला 6 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. एवढेच नाही तर या पराभवानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरीतूनही बाहेरचा रस्ता पकडवा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानमधून चित्र विचित्र प्रतिक्रिया यायला सुरवात झाली होती. दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने भारतीय संघाला आव्हान दिले आहे.
नेमकं आव्हान काय?
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी बोलत असताना सकलेन मुश्ताक म्हणाला की, ‘राजकीय गोष्टी बाजूला सारल्या तर भारतीय खेळाडू खूप चांगले असून ते चांगले क्रिकेटही खेळत आहेत. जर भारत खरोखरच चांगला संघ असेल, तर मला वाटते की त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 10 कसोटी, 10 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळायला पाहिजेत, त्यानंतर सर्व काही समोर येईल.’
सकलेन यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला की, ‘पाकिस्तान संघाची तयारी चांगली असेल तर पाकिस्तान संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी शक्ति बनू शकतो. जर आपण आपली तयारी चांगली केली आणि गोष्टी योग्य दिशेने सोडवत गेलो. तर आपण अशा स्थितीत पोहचू की जगाला आणि भारतालाही आपण जोरदार प्रत्युत्तर देऊ शकू.’
हेही वाचा : India vs New Zealand : विराट कोहलीची आज होणार ट्रिपल सेंच्युरी! नजर टाका ‘किंग’च्या आकडेवारीवर
टीम इंडियाने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा..
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी 6 विकेट्सने पराभव केला होता. सर्वात प्रथम पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. पाकिस्तानची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नव्हती, मात्र नंतर मोहम्मद रिझवान आणि साउद शकिल या दोघांनी 100 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारताविरुद्ध ओकले विष, म्हणाला ‘तुमचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवू’
त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला भारतीय गोलंदाजांनी 49.2 ओव्हर्समध्ये ऑल आउट केले होते. या सामन्यात प्रतिउत्तरात भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले होते. पाकिस्तानच्या या पराभवानंतर पाकिस्तानातून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, ज्यामध्ये कोणी आपल्याच संघावर तर कोणी भारतावर टीका करत असल्याचे दिसून येत आहेत.