Virat Kohli Test Retirement: 'Virat Kohli wanted to continue playing Test cricket, but..' Sensational claim of former Indian cricketer..
Virat Kohli Test Retirement : विराट कोहली १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीने देखील निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अशातच विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक खळबळजनक दावा केला आहे.
कैफने दावा केला आहे की, विराट कोहलीला बीसीसीआयचा पाठिंबा आणि मदत मिळाली नाही. त्यानंतर विराटला तात्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी लागली आहे. कैफ पुढे म्हणाला की, त्याला टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळत राहायचे होते.
कैफ म्हणाला की, मला वाटतं की त्याला या फॉरमॅटमध्ये खेळत राहायचे होते. असं कैफ म्हणाला. तो पुढे म्हणाला की, बीसीसीआयसोबत काही अंतर्गत चर्चा झाली असावी, निवडकर्त्यांनी गेल्या ५-६ वर्षातील त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला असावा आणि त्याला आता संघात स्थान नसल्याचे सांगण्यात आले असावे. नेमकं काय घडले? हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. पडद्यामागे खरोखर काय घडले याचा अंदाज लावणे खूप अवघड काम आहे.
कैफने पुढे सांगितले की, शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयाचा जर विचार केला तर, मला वाटते की तो इंग्लंड दौऱ्यासाठी जाण्यास सज्ज होता. या काळात तो स्थानिक क्रिकेट रणजी ट्रॉफी देखील खेळला होता. गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी पाहता, त्याला बीसीसीआय आणि निवडकर्त्यांकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळू शकला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना विराट कोहलीने ९ डावात फक्त १९० धावा केल्या होत्या. ज्यामुळे भारताला मालिका ३-१ अशी गमवावी लागली होती. या काळात त्याच्या बॅटमधून सुरुवतीच्या कसोटीत शतक देखील केले होते. परंतु, त्यानंतर तो सतत अपयशी ठरत गेला. तो ८ डावांमध्ये फक्त ९० धावा करू शकला होता. याबद्दल कैफ म्हणाला होता की, ऑस्ट्रेलियात धावा करण्याच्या घाईमुळे कोहलीची कसोटी कारकीर्द वेगाने घसरत गेली आहे.
हेही वाचा : CBSE Result : क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या Vaibhav Suryavanshi ला सीबीएसई परीक्षेत अपयश! वाचा सविस्तर..
कोहलीने त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत.