शोएब मलिक(फोटो-सोशल मीडिया)
Shoaib Malik fired : सद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. ज्याची झळ दोन्ही देशातील क्रीडा स्पर्धांना बसली आहे. अशातच पाकिस्तानमधून एक बातमी समोर आली आहे. ती बातमी पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू सोएब मलिकशी संबंधित आहे. या दिग्गज खेळाडू शोएब मलिकने नुकताच आपल्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, खरी बातमी अशी आहे की त्यांनी राजीनामा दिला नाही तर तो त्यांच्याकडून तो जबरदस्तीने घेण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता त्यांच्या देशांतर्गत स्पर्धेतील चॅम्पियन्स कपच्या सर्व मार्गदर्शकांवर कारवाई करण्याच्या विचरात आहे. पीसीबी गेल्या वर्षी चॅम्पियन्स कप संघांसाठी नियुक्त केलेल्या सर्व ५ मार्गदर्शकांना काढून टाकणार असल्याची माहिती आहे. अशातच चॅम्पियन्स कप संघ स्टॅलियन्सचा मार्गदर्शक शोएब मलिक राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून २६ ऑगस्ट २०२४ रोजी चॅम्पियन्स कप संघांसाठी – डॉल्फिन्स, पँथर्स, लायन्स, स्टॅलियन्स आणि मार्खोर्स – मार्गदर्शकांची नियुक्ती केली होती. शोएब मलिक व्यतिरिक्त, मिसबाह-उल-हक, वकार युनूस, सरफराज अहमद आणि सकलेन मुश्ताक हे पीसीबीने मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलेले इतर काही दिग्गज खेळाडू आहेत. त्या सर्वांचा करार ३ वर्षांसाठीचा करण्यात आला होता आणि त्यांचा पगार ५० लाख पाकिस्तानी रुपये निश्चित करण्यात आले होते.
त्यावेळी त्यांच्या नियुक्तीबद्दल आणि तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या पगाराबद्दल देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद याबाबत म्हणाले होते की, या सर्वांना मार्गदर्शक म्हणून ५० लाख पाकिस्तानी रुपये देण्यात येत आहेत. याचा अर्थ असा आहे का? की, सर्वांची पातळी इतकी आहे का? की, त्यांना ५० लाख रुपये पगार द्यायला हवा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे, की पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी चॅम्पियन्स कप संघांसाठी निवडलेल्या पाच मार्गदर्शकांपासून स्वतःला लांब ठेवू इच्छित आहेत. तथापि, स्टॅलियन्सचे मार्गदर्शक शोएब मलिक याने १३ मे रोजी राजीनामा दिला तेव्हा त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नव्हती. शोएब मलिकच्या मते, त्याच्याकडून २ आठवड्यांपूर्वी पीसीबीला त्यांच्या निर्णयाची सपूर्ण माहिती दिली होती. आता प्रश्न असा निर्माण झाला की, शोएब मलिक खरच पीसीबीच्या निर्णयाचा बळी ठरला आहे की त्याने स्वतःहून मार्गदर्शकाचा राजीनामा दिला आहे?