वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडिया)
Vaibhav Suryavanshi CBSE Result : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. परंतु, आता ते पुन्हा सुरू होणार आहे. या आयपीएलच्या १८ व्या हंगामात बिहारचा १४ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी सर्वात जास्त चर्चा झाली आहे. ज्याने अगदी लहान वयातच आपली खास आक्रमक शैली दाखवून सर्वांना वेड लावले आहे. जागतिक स्तरावरून सर्वांनी त्याची दखल देखील घेण्यात आली आहे. पण आता एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात दावा करण्यात येत आहे की, सूर्यवंशी त्याच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव सूर्यवंशीच्या निकालांशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आश्चर्यकारक घडामोडीत, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत नापास झाला आहे. एका असामान्य पावलात, बीसीसीआयने संभाव्य मूल्यांकन त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करून त्याच्या उत्तरपत्रिकेची डीआरएस-शैलीची पुनरावलोकन करण्याची औपचारिक विनंती केली आहे.” असे लिहिण्यात आले होते.
राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याची बातमी सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तथापि, या मागील सत्य हे आहे की वैभव दहावीत नापास झाला नाही, तो उत्तीर्ण होऊन अकरावीत पोहोचला आहे हे देखील सत्य नाही. गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की, वैभव सूर्यवंशीच्या अपयशाची बातमी खोटी आहे. कारण, वैभव सूर्यवंशी हा ९वीचा विद्यार्थी आहे.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते, हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला असून त्याने युसूफ पठाणचा ३७ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम देखील मोडीत काढला आहे.
फलंदाज वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आतपर्यंत ५ सामन्यांमध्ये २०९.४५ च्या स्ट्राईक रेटने १५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १६ षटकार आणि १० चौकार देखील लागवले आहेत. तथापि, त्याचा संघ राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.