नेदरलँड विरुद्ध भारत यांच्यातील टी २० विश्वचषकाचा दुसरा सामना सिडनी येथील क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली असून त्याने ३७ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. विराट आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही खेळाडू मैदानात भारतीय संघाची खिंड लढवत आहेत. नेदरलँड समोर भारत मोठे आव्हान ठेवण्याच्या तयारीत आहे.