Photo Credit - FanCode
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये एबी डिव्हिलियर्सचा दबदबा कायम आहे. त्याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहून चाहते त्याला निवृत्ती मागे घेण्याची मागणी करत आहेत. ४१ वर्षीय एबीने गुरुवारी आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली. या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध पहिल्यांदा २१ चेंडूत अर्धशतक झळकावले. तथापि, त्यानंतरही तो थांबणार नव्हता. एबीने ४१ चेंडूत शतक झळकावले.
दुसऱ्या डावात हाशिम अमलाने त्याला चांगली साथ दिली. दोघांच्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने १० विकेट्सने सामना जिंकला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड चॅम्पियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून १५२ धावा केल्या. सलामीवीर फिल मस्टर्डने ३९, रवी बोपारा यांनी ७, मोईन अलीने १०, समित पटेलने २४, कर्णधार इऑन मॉर्गनने २० आणि इयान बेलने ७ धावा केल्या. टिम अॅम्ब्रोस याने १९ धावा केल्या तर लियाम प्लंकेट १३ धावांची नाबाद खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून वेन पार्नेलने २ बळी घेतले. त्याच्याशिवाय इम्रान ताहिरनेही २ बळी घेतले. ख्रिस मॉरिस आणि डुएन ऑलिव्हियर यांनी १-१ बळी घेतला.
Mr. 360 at full throttle! 👽
AB de Villiers hammers an unbeaten 116 (51) as South Africa Champions dismantle England Champions by 10 wickets. 🌪️#WCL2025 #SouthAfrica #ABD #Sportskeeda pic.twitter.com/9HZloaNJxK
— Sportskeeda (@Sportskeeda) July 24, 2025
दक्षिण आफ्रिकेने १५३ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. कर्णधार एबीने २२७.४५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ५१ चेंडूत ११६ धावा केल्या. या डावात एबीने १५ चौकार आणि ७ उत्कृष्ट षटकार मारले. हाशिम अमलाने त्याला चांगली साथ दिली. २५ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा काढल्यानंतर तो नाबाद राहिला.
याआधी, इंडिया चॅम्पियन्सविरुद्धही एबी डिव्हिलियर्सचा वादळ पाहायला मिळाला होता. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सच्या कर्णधाराने भारतीय संघाविरुद्ध ३० चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत मिस्टर ३६० ने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेने डीएलएस पद्धतीने हा सामना ८८ धावांनी जिंकला.
IND vs ENG 4th Test : भारताच्या गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजांनी केली धुलाई! वाचा सामन्याचा अहवाल
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात एबीची बॅट शांत राहिली. त्याने ४ चेंडूंचा सामना केला आणि ३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने हा सामना एका बॉल आऊटमध्ये जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यत या स्पर्धेमध्ये ३ विजय मिळवले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे.