West Indies Champions Won WCL 2026
टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक
डब्ल्यूसीएल २०२६ चा अंतिम सामना वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स यांच्यात खेळला गेला. शारजा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंड संघाकडून मोईन अलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. ओवैस शाहनेही ३८ धावा केल्या. त्यांनी २० षटकांत ७ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राव्होने ३ विकेट्स घेतले.
अंतिम सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला १६० धावांची गरज होती. कर्णधार ख्रिस गेल आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. गेलने १४ चेंडूंमध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर, सिमन्सने चॅडविक वॉल्टनसोबत भागीदारी केली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत १७ षटकांत यशस्वीपणे लक्ष्याचा पाठलाग केला. लेंडल सिमन्सने ५३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ८ चौकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. चॅडविकने ३५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. वेस्ट इंडिजने ९ वकेट्स राखून विजय मिळवला आणि डब्ल्यूसीएल २०२६ ट्रॉफी जिंकली.
वेस्ट इंडिजचा विकेटकीपर-फलंदाज चॅडविक वॉल्टनला स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. त्याने सात सामन्यांमध्ये १६७.६५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत २० चौकार आणि २८ षटकारांसह ३४२ धावा केल्या. त्याने सातपैकी चार सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. तसेच, वेस्ट इंडिजला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धा गेल्या तीन वर्षांपासून खेळली जात आहे. पहिला हंगाम २०२४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. इंडियन चॅम्पियन्सने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून ट्रॉफी जिंकली. २०२५ च्या दुसऱ्या हंगामात साऊथ आफ्रिकन चॅम्पियन्सने ट्रॉफीवर नाव कोरले . आता, तिसऱ्या हंगामात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने ट्रॉफीवर कब्जा केला आहे.






