फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताच्या संघाचा पहिला T२० विश्वचषकाचा सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. काल म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी भारताचा महिला क्रिकेट संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पराभावामुळे टीम इंडिया संकटात दिसत आहे. भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच निराशाजनक कामगिरी केली त्याचबरोबर संघाने अनेक कॅच देखील सामन्यात सोडले त्यामुळे न्यूझीलंडचा संघ १६० धावा करू शकला. भारतीय महिला फलंदाजांनी देखील निराशाजनक कामगिरी केल्यामुळे संघ मोठ्या धावसंख्येने पराभूत झाला.
भारताचा T२० महिला विश्वचषक २०२४ चा दुसरा सामना ६ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे. भारताचा संघ जर ग्रुपमधील गुणतालिकेवर टॉप २ मध्ये असेल तर संघ उपांत्य फेरीचा सामना खेळू शकणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला होणारे सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. भारतीय महिला संघाचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्याचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या महामुकाबल्यासाठी क्रिकेट प्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. भारताचा संघ त्याच्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध त्यांना पराभूत करून स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबरला सामना होणार आहे. टीम इंडियाचे चाहते सर्व सामने टीव्हीवर तसेच मोबाईलवर पाहू शकतील. चाहत्यांना घरबसल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येणार आहे. महिला T२० विश्वचषक भारतात टीव्ही चॅनेल तसेच मोबाईल ॲप्सवर प्रसारित केला जाणार आहे. टीम इंडियाचे चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतील. विशेष म्हणजे हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर अनेक भाषांमध्येही कॉमेंट्री ऐकू येते. जर आपण मोबाईल ॲपबद्दल बोललो तर ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट पाहिले जाऊ शकते. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. यानंतर त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.