फोटो सौजन्य - सोशल मीडिया
लिओनेल मेस्सी फिटनेस अपडेट : भारतामध्ये सर्वाधिक पसंतीचा खेळ म्हणजेच क्रिकेट, परंतु जगामध्ये सर्वात जास्त फुटबॉल पहिला जातो. त्याचबरोबर अर्जेन्टिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगीजचा क्रिस्टियानो रोनाल्डो यांची जगभरामध्ये चाहते आहेत. या दोघांना खेळताना पाहणे प्रेक्षक पसंत करतात. जुलैमध्ये झालेल्या कोपा अमेरिका २०२४ मध्ये मैदानामध्ये लिओनेल मेस्सीला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याने दुसऱ्या हाफमध्ये विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी यांच्या डोळयात अश्रू दिसले, परंतु त्यानंतर अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने एक्सट्रा टाइममध्ये 1-0 असा विजय मिळवला.
त्या गोलनंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेचे विजेतेपद नावावर केले होते. मेस्सीला लिगामेंटला दुखापत झाली आहे अशी माहिती देण्यात आली होती आणि म्हणूनच तो तेव्हापासून मैदानाबाहेर आहे. सप्टेंबरमध्ये चिली आणि कोलंबियाविरुद्ध अर्जेंटिनाच्या विश्वचषक पात्रता फेरीसाठीही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच लिओनेल मेस्सी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार असा चाहत्यांचा प्रश्न आहे. याचसंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चाहत्यांचा आवडता फुटबॉलर लिओनेल मेस्सीचे पुनरागमन १४ सप्टेंबर रोजी फिलाडेल्फिया युनियन विरुद्ध इंटर मियामीच्या आगामी होम गेममध्ये पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.
युवा फ़ुटबाँल खेळाडू लिओनेल मेस्सीला एक आदर्श म्हणून पाहतात. त्याचबरोबर तो सर्वाधिक गोल करण्याच्या यादीमध्ये पहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचबरोबर फिफा (FIFA) द्वारे विक्रमी आठ वेळा त्याला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर लिओनेल मेस्सी हा ४४ सांघिक ट्रॉफीसह तो व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात सुशोभित खेळाडू आहे. लिओनेल मेस्सीच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यत क्लब-विक्रमी ३४ ट्रॉफी मिळवल्या आहेत. यामध्ये १० लीगा ट्रॉफी, ७ कोपा डेल रे ट्रॉफी आणि ४ UCL विजेतेपदे आहेत. अर्जेंटिनासह, त्याच्याकडे दोन कोपा अमेरिका विजेतेपद आणि २०२२ विश्वचषक ट्रॉफी आहे.