फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयपीएल २०२५ : इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची सर्व संघाच्या मालकांची मेगा ऑक्शनची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये कोणत्या खेळाडूंना घायचे, कोणत्या खेळाडूंना सोडायचे आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचे यासंदर्भात नियोजनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता यावर काही खेळाडूंच्या प्रतिक्रिया येत आहेत त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनची तयारी सुरु झाली आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शन आधी सर्व संघ त्यांच्या मर्यादित खेळाडूंनाच संघामध्ये ठेवू शकतात. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रिंकू सिंहला रिटेन करणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता रिंकूने स्वतः सांगितले की, जर कोलकात्याने त्याला रिटेन केले नाही तर त्याला कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल.
स्पोर्ट्स टाकशी बोलताना रिंकू सिंहने सांगितले की, जर कोलकात्याने त्याला रिटेन केले नाही तर त्याला आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळायला आवडेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आजपर्यत एकही आयपीएलची ट्रॉफी नावावर केली नाही परंतु त्यासंघाची फॅनफॉलोईंग प्रचंड आहे. या संघामधील खेळाडूंना चाहते प्रचंड पसंत करतात. त्याचबरोबर क्रिकेट खेळाडू सुद्धा खेळाडू अनेकदा बंगळुरूसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात.
रिंकू सिंग आणि विराट कोहली यांना बऱ्याचदा प्रेक्षकांनी एकत्र पहिले आहेत. त्यामुळे त्याने अंदाज लावला जातो की विराट कोहली आणि रिंकू सिंह यांची मैत्री चांगली आहे २०२४ च्या आयपीएल दरम्यान रिंकूने विराट कोहलीकडे बॅट मागितली होती आणि खेळताना ती तुटली, त्यानंतर केकेआरचे फलंदाज किंग कोहलीकडे दुसरी बॅट मागायला आले. रिंकू सिंग आणि विराट कोहली त्यांच्या बॅटमुळे खूप चर्चेत होते.
कोलकाता नाईट रायडर्सने २०१८ मध्ये रिंकू सिंगला ८० लाख रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून केकेआरने रिंकूला सातत्य राखले आहे. त्यानंतर २०२२ च्या मेगा लिलावात रिंकूची किंमत थोडी कमी झाली आणि KKR ने त्याला ५५ लाख रुपयांना जोडले. रिंकूने आता केकेआरसोबत बराच काळ घालवला आहे, हे लक्षात घेता केकेआर रिंकूला कायम ठेवणार नाही असे अजिबात वाटत नाही.