भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे : भारताचा संघासमोर (Team India) आज झिम्बाम्ब्वेचे आव्हान असणार आहे. आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंना कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) संधी देणार याकडे एकदा नजर टाकणे गरजेचे आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल करण्यात आले होते. यामध्ये T२० विश्वचषकाचा भाग असलेले शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी मिळाली होती. भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे (India vs Zimbabwe) यांच्यामध्ये पाच सामान्यांची मालिका होणार आहे. यामध्ये आज चौथा सामना रंगणार आहे.
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-१ अशी या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. खेळपट्टीचा विचार केला तर फिरकीला अनुकूल झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याच्यासह सहकारी खेळाडूंना फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. हरारे स्पोर्टस क्लबच्या खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आहे. फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा मारा खेळणे यजमानांना कठीण जात आहे.चौथ्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे एकदा नजर टाकू.
आजच्या सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. भारताचा युवा खेळाडू रियान पराग याने संघामध्ये पदार्पण केले परंतु त्याला हवी तेवढी संधी अजुनपर्यत मिळालेली नाही. त्यामुळे आज त्याला संघामध्ये संधी मिळू शकते. त्याच्या जागेवर शिवम दुबेला विश्रांती मिळू शकते. भारतीय संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर सध्या खलील अहमद आणि आवेश खान यांना आजच्या सामन्यात विश्रांती देऊन तुषार देशपांडेला विश्रांती दिली जाऊ शकते.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.