
Who is Laila Faisal, who took Abhishek Sharma's wicket? Social media claims she is the explosive opener's girlfriend; read the details.
Who is Abhishek Sharma’s girlfriend, Laila Faisal? : भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण करताना दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी२० मालिकेत अभिषेक शर्मा मैदानावर चौकार आणि षटकार मारून गोलंदाजांना जेरीस आणत आहे. अभिषेक मैदानावर जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बाहेर देखील त्याच्या चॉकलेटसारख्या लूक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी तो लोकप्रिय आहे. दरम्यान, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अलीकडेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की अभिषेक शर्मा लवकरच त्याची कथित प्रेयसी लैला फैसलशी विवाह करणार आहे. पोस्टमध्ये असे देखील लिहिले आहे की, हे दोघे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी लग्न देखील करणार आहेत. या दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, लैला फैसल कोण आहे? त्यासाठी चाहते तिचा शोध गुगलवर घेताना दिसत आहेत.
लैला फैसलचा जन्म २००० मध्ये दिल्लीमध्ये झाला आहे. तर तिचे कुटुंब मूळचे काश्मीरचे असून तिने दिल्लीतील आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये आपले शिक्षण घेतले आणि नंतर लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे. तिच्या अभ्यासासोबतच लैलाला नेहमीच फॅशन आणि सर्जनशील क्षेत्रात रस दाखवत आली आहे. पदवीनंतर, लैलाने लंडनच्या कला विद्यापीठात फॅशन डिझाइन, मार्केटिंग आणि स्टाइलिंगचा अभ्यास देखील केला आहे. त्यानंतर तिने तिची आई रुही फैसल यांच्यासोबत “एलआरएफ डिझाइन्स” हे फॅशन लेबल स्थापन केले. हा ब्रँड काश्मिरी शैलीवर आधारित आधुनिक आणि लक्झरी कपड्यांसाठी ओळखला जातो.
अभिषेक शर्मा आणि लैला फैसल हे दोघे पहिल्यांदा २०२५ च्या सुरुवातीला एकत्र आले होते. त्यांना अनेक वेळा एकत्र पपाहण्यात आले. आयपीएल आणि टीम इंडिया सामन्यांदरम्यान लैला स्टेडियममध्ये अभिषेकला जयजयकार करताना देखील दिसून आली होती. इंग्लंडविरुद्ध अभिषेकच्या शतकानंतर, लैलाने इंस्टाग्रामवर “प्राउड” पोस्ट केली, ज्यामुळे त्या दोघांच्या नात्याबाबत अफवांना आणखीच जास्त बळकटी मिळाली आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेला अभिषेक आणि लैलाच्या लग्नाचा दावा ही केवळ अफवा असल्याचे समोर येत आहे. अभिषेक शर्मा १४ फेब्रुवारी २०२६ रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत श्रीलंकेत असेल आणि १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध एक महत्त्वाचा सामना खेळणार आहे.तथापि, लग्नाच्या बातमीबाबत अभिषेक शर्मा किंवा त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत अशी पुष्टी देण्यात आलेली आहे.