फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय क्रिकेट संघाचे २०२५ चे वेळापत्रक : भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळत आहे. या मालिकेचे दोन सामने झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने एक सामना जिंकला आहे तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. या मालिकेचा तिसरा सामना १४ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. आता २०२४ चे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि लवकरच २०२५ चे नवे वर्ष सुरु होणार आहे. नववर्षानिमित्त भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच राहणार आहे. नव्या वर्षात त्याची पहिली कसोटी फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच होणार आहे. पण २०२५ चा पहिला एकदिवसीय आणि पहिला T२० इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे रंगणार आहे. यानंतर नवीन वर्ष सुरू होईल. टीम इंडिया ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे. 2025 मधील हा त्याचा पहिला सामना असेल. यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक कसे असेल यावर एकदा नजर टाका.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 5वी कसोटी – सिडनी ३ जानेवारी – ७ जानेवारी
( भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा कसोटी सामना 30 डिसेंबर रोजी संपेल)
भारत विरुद्ध इंग्लंड – पहिला T20 – 22 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – दुसरी T20 – 25 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – तिसरा T20 – 28 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – चौथी T20 – 31 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – 5वी T20 – 02 फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – पहिली एकदिवसीय – 06 फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – दुसरी एकदिवसीय – ०९ फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – तिसरी एकदिवसीय – १२ फेब्रुवारी
टीम इंडिया सध्या 57.29 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांचे गुण अनुक्रमे 63.33 आणि 60.71 टक्के आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही भारत WTC अंतिम फेरीत पोहोचू शकतो. गब्बा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकून मालिका 3-1 अशी जिंकली, तर त्यांना अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळेल. गाब्बा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, भारताने पुढील दोन सामन्यांपैकी एक जिंकला आणि एक गमावला, तर मालिका 2-2 अशी संपुष्टात येईल. या स्थितीत टीम इंडियाला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. शेजारच्या संघाने ती मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकावी अशी भारताला प्रार्थना करावी लागेल.