फोटो सौजन्य – X (FanCode)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सध्या t20 मालिका सुरू आहे, या t20 मालिकेचा आज तिसरा सामना खेळविण्यात आला. वेस्टइंडीजच्या संघाने आजच्या सामन्यात चार विकेट्स गमावून 214 धावांचा डोंगर उभा केला होता. वेस्टइंडीजची फलंदाजी पाहून वेस्टइंडीज हा सामना जिंकेल अशा संघाला नक्कीच असतील पण त्यांचे स्वप्नही टीम डेविडने नष्ट केले. वेस्टइंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या t20 मालिकेचा आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत या तीनही सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार पद हे मिचेल मार्श कडे आहे तर वेस्टइंडीज संघाचे कर्णधार पद हे शाई होप त्याच्याकडे आहे. वेस्टइंडीज च्या संघाने तिसऱ्या t20 सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामी वीर फलंदाज ब्रायडन किंग आणि शाही होप या दोघांनीही 120 हून अधिक धावांची भागीदारी केली. वेस्टइंडीज च्या चांगला सुरुवात मिळाल्यामुळे वेस्टइंडीज संघाने पहिले फलंदाजी करत चार विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या.
THE FASTEST T20I 50 IN AUSTRALIAN HISTORY! 🔥 🔥 🔥 Tim David absolutely monsters his way to the half-century off 16 balls. Catch every ball of Australia’s tour of the West Indies live on ESPN on Disney+ 📺 pic.twitter.com/YY0AEj2xn7 — ESPN Australia & NZ (@ESPNAusNZ) July 26, 2025
शाही होप याने 57 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या यामध्ये त्यांनी सहा षटकार आणि आठ चौकार मारले. 179 च्या स्ट्राईक रेटने त्याने केली. ब्रँडोन किंग याने संघासाठी 36 चेंडू मध्ये 62 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने सहा षटकार आणि तीन चौकार मारले. वेस्ट इंडीजच्या संघाने चांगली फलंदाजी केली पण ते टीम डेविडला रोखण्यात अपयशी ठरले. टीम डेविड हा वेस्ट इंडीजच्या संघावर भारी पडला आणि त्याने शतक झळकावुन कांगारुच्या संघाला विजय मिळवुन दिला.
या सामन्यात टिम डेव्हिडने स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त ३७ चेंडूत शतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ षटकार आणि ६ चौकार लागले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २७५.६८ होता. यासह, टिम डेव्हिड आता ऑस्ट्रेलियाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. या सामन्यात टिम डेव्हिडने ३७ चेंडूत १०२ धावा करत नाबाद राहिला.
IND vs ENG : भारतीय संघाच्या हातून सामना निसटला! इंग्लंडकडे 500 हून अधिक धावांची आघाडी, वाचा सविस्तर
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावून २१४ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना कर्णधार शाई होपने शानदार शतक झळकावले आणि ५७ चेंडूत १०२ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ६ षटकार निघाले. याशिवाय ब्रँडन किंगने ३६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने २१५ धावांचे लक्ष्य १६.१ षटकात ४ गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिडने १०२ आणि मिचेल ओवेनने १६ चेंडूत ३६ धावा केल्या. ज्यामध्ये ३ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.