Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स या पाच खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करेल का?

१९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना त्यांच्या संघाचा भाग बनवू इच्छित आहे?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 14, 2023 | 05:08 PM
आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स या पाच खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करेल का?
Follow Us
Close
Follow Us:
मुंबई इंडियन्स : अलीकडेच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सशी व्यवहार केला. पण जोफ्रा आर्चरसह अनेक मोठी नावे मुंबई इंडियन्स मध्ये नाहीत. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसोबत व्यवहार झाला. म्हणजेच आता कॅमेरून ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. मात्र, १९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना त्यांच्या संघाचा भाग बनवू इच्छित आहे? आज आपण अशा खेळाडूंवर एक नजर टाकणार आहोत ज्यांच्यासाठी मुंबई इंडियन्स लिलावात करोडो रुपये खर्च करू शकतात.
जेराल्ड कोएत्झी
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने विश्वचषकात चांगलीच छाप पाडली होती. जेराल्ड कोएत्झीने २० विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चर आणि कॅमेरून ग्रीन या खेळाडूंना सोडले. म्हणजेच मुंबई इंडियन्स संघात अनेक परदेशातील स्लॉट आहेत. तसेच मुंबई इंडियन्सला चांगल्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स जेराल्ड कोएत्झीवर पैशांचा वर्षाव करू शकते.
ब्युरेन हेनरिक
जर मुंबई इंडियन्सने गेराल्ड कोएत्झीचा संघात समावेश केला नाही तर बुरेन हेन्रिक्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बुरेन हेन्रिक्स हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, तो आपल्या वेग आणि कोनातून विरोधी फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स बुरेन हेन्रिक्सवर बोली लावू शकते.
वानेंदू हसरंगा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने वानेंदू हसरंगा याला सोडण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच तो लिलावात उपलब्ध होईल. मुंबई इंडियन्स एका चांगल्या लेगस्पिनरच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत ५ वेळचा चॅम्पियन संघ वानेंदू हसरंगाला विकत घेऊ शकतो. तसेच गोलंदाजीव्यतिरिक्त वानेंदू हसरंगा फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. अशा प्रकारे मुंबई इंडियन्ससाठी वानेंदू हसरंगा हा एक चांगला पर्याय आहे.
मुजीब उर रहमान
सध्या मुंबई इंडियन्सकडे २ लेगस्पिनर आहेत, पण ऑफस्पिनर नाहीत. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानवर बोली लावू शकते. अलीकडेच मुजीब उर रहमानची विश्वचषक स्पर्धेतही चांगली कामगिरी झाली होती. अशा परिस्थितीत मुजीब उर रहमानला लिलावात योग्य पैसे मिळू शकतात.
जॉर्ज लिंडे
जर वानेंदू हसरंगा आणि मुजीब उर रहमान यांना लिलावात जास्त बोली लागली, तर मुंबई इंडियन्ससाठी या दोन खेळाडूंना खरेदी करणे सोपे जाणार नाही, कारण मुंबई इंडियन्सकडे जवळपास १३ कोटी रुपयांची पर्स आहे. पण जर मुंबई इंडियन्स वानेंदू हसरंगा आणि मुजीब उर रहमान या दोघांनाही खरेदी करण्यात अपयशी ठरले तर जॉर्ज लिंडे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जॉर्ज लिंडेची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे.

Web Title: Will mumbai indians spend crores of rupees on these five players in ipl auction indian premier league 2024 ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2023 | 05:08 PM

Topics:  

  • Indian Premier League 2024
  • IPL
  • ipl auction
  • mumbai indians

संबंधित बातम्या

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video
1

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 
2

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?
3

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला
4

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.