शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral

मैदानावरील फलंदाज आउट झाला की डगआउटमधून येणाऱ्या फलंदाजाने पुढील 75 सेकंदात खेळण्यासाठी तयार राहणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी फलंदाजाने गार्ड घेण्यापूर्वीच चेंडू स्टंप्सवर आदळला.
75 सेकंदात पीचवर न आल्याने गेली विकेट
डीनड्रा डॉटिन न खेळताच झाली आऊटWomen's Big Bash League
Published on: 
Updated on: 
  • वूमन बिग बॅश लीगमध्ये घडला विचित्र प्रकार

  • 75 सेकंदात पीचवर न आल्याने गेली विकेट

  • क्रीजवर जाण्याआधीच फलंदाज झाला क्लीन बोल्ड

Women's Big Bash League: क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेक विविध प्रकारेच प्रसंग पाहत असतो. मात्र तुम्ही कधी फलंदाज क्रीजवर नसताना त्याला आउट दिल्याचे पाहिले आहे का? मग वूमन बिग बॅश लीगमध्ये असा विचित्र प्रकार घडला आहे. ही घटना पाहिल्यावर लोकांना अक्षरश: गल्ली क्रिकेटच्या नियमांची आठवण झाल्याशिवाय राहिली नसेल. नेमकी ही घटना काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

क्रीजवर फलंदाज पोहोचलाच नव्हता. त्याने बॅटिंग गार्ड देखील घेतला नव्हता. तरीही देखील गोलंदाजाने बॉल टाकला आणि स्टंप उडवले. मात्र खास गोष्ट अशी की अंपायरने तया बॅट्समनला आउट घोषित केले. महिला बिग बॅश लीगमध्ये हा अनपेक्षित प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Handshake Controversy : 'नो हँडशेक' मागे खूप मोठे मुद्दे, ज्यावर आमचा नियंत्रण नाही : MCC हेड ऑफ क्रिकेट

नेमका प्रकार काय?

मैदानावरील फलंदाज आउट झाला की डगआउटमधून येणाऱ्या फलंदाजाने पुढील 75 सेकंदात खेळण्यासाठी तयार राहणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी फलंदाजाने गार्ड घेण्यापूर्वीच चेंडू स्टंप्सवर आदळला आणि अंपायरने दिलेल्या आउट या निर्णयामुळे क्रिकेटच्या इतिहासात वेगळ्याच घटनेची नोंद झाली.

वुमेंस बिग बॅश लीगमध्ये वेस्ट इंडिजची खेळाडू डीनड्रा डॉटिन हिला मैदानावर येण्यास थोडा विलंब झाल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमानुसार, टी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उशिरा दाखल झाली. त्यामुळे तिला टाइम्ड आउट असे घोषित केले जाते. मात्र WBBL मध्ये २०२१-२२ च्या हंगामापूर्वी या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला होता.

IND A vs UAE : वैभव सूर्यवंशानं ODI चा चेहरा मोहराच बदलला, आधी 28 चेंडूंत शतक, तर 53 चेंडूंत ठोकलं खणखणीत द्विशतक

WBBL च्या नव्या नियमानुसार, आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला पुढील बॉल खेळण्यासाठी ७५ सेकंदांच्या आत सज्ज राहणे बंधनकारक असते. या प्रसंगामध्ये डीनड्रा डॉटिन या ७५ सेकंदांची ठरलेली वेळ ओलांडली होती. 'टाइम्ड आउट' करण्याऐवजी शिक्षा म्हणून डॉटिन यांना क्रीजवर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आणि गोलंदाजाला एक 'फ्री बॉल' टाकण्याची संधी देण्यात आली.

वुमेंस बिग बॅश लीगमध्ये या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. निर्धारित 75 सेकंदांच्या वेळेत मैदानावर न पोहोचल्यामुळे वेस्ट इंडिजची खेळाडू डीनड्रा डॉटिन हिला लीगमधील विशेष नियमानुसार क्रीजपासून दूर थांबावे लागले. ब्रिस्बेन हीटची गोलंदाज सारा ग्लेनने बॉल टाकला आणि तो स्टंपवर जाऊन लागला. त्यामुळे डीनड्रा डॉटिनला आउट घोषित केले गेले.

Q

वूमन बिग बॅश लीगमध्ये कोणती विचित्र घटना घडली?

A

वूमन बिग बॅश लीगमध्ये फलंदाज क्रीजवर नसताना त्याला बाद घोषित करण्याची विचित्र घटना घडली. त्यामुळे या घटनेची क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली.

Q

वूमन बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा का होत आहे?

A

क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच पाहायला मिळणारा हा प्रकार असल्याने चाहत्यांना गल्ली क्रिकेटमधील नियमांची आठवण झाली आणि या घटनेची चर्चा रंगली.

75 सेकंदात पीचवर न आल्याने गेली विकेट
IND Vs JAP: भारताच्या वाघिणींनी जपानला फाडून खाल्ले; 4-0 ने पराभव अन् थेट 'या' रॅंकिंगमध्ये...