Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Women World Cup 2025 : “मला आशा होती, भारत…”, इंग्लंडविरुद्ध पराभव जिव्हारी; स्मृती मानधनाने व्यक्त केली खंत

रविवारी,१९ ऑक्टोबर रोजी महिला विश्वचषक २०२५ च्या २० व्या सामन्यात भारत इंग्लंडकडून ४ धावांच्या कमी फरकाने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताची स्मृती मानधना निराश झाल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 20, 2025 | 08:32 PM
Women's World Cup 2025: "I was hoping India...", Smriti Mandhana expresses regret after losing to England

Women's World Cup 2025: "I was hoping India...", Smriti Mandhana expresses regret after losing to England

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs  ENG W : महिला विश्वचषक २०२५ च्या २० व्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगला होता. रविवारी,१९ ऑक्टोबर रोजी खेळला गेलेल्या सामन्यात भारत इंग्लंडकडून ४ धावांच्या कमी फरकाने पराभूत झाला. भारताचा विश्वचषकातील हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना पत्रकार परिषदेत आली तेव्हा ती अत्यंत निराश दिसून झाली. होळकर स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून २८८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडिया निर्धारित षटकांमध्ये ६ गडी गमावून फक्त २८४ धावापर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात  सलामीवीर स्मृती मानधनाने ९४ चेंडूत ८ चौकारांसह ८८ धावा फटकावल्या, परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

हेही वाचा : PAK-AFG WAR : ICC च्या ‘त्या’ विधानाने पाकला झोंबली मिरची! अफगाणी क्रिकेटपटू मृत्यू प्रकरण; वाचा सविस्तर

४१.२ षटकामध्ये मानधना लिन्सी स्मिथकरवी झेलबाद झाली. त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. मानधनाला बाद केल्यानंतर इंग्लंडच्या संघात आनंदाचे वातावरण दिसून आले, पण स्टेडियममध्ये उपस्थित असलेले भारतीय चाहते गंभीर झाले होते.

 स्मृती मानधना नेमकं काय म्हणाली?

सामन्यानंतर स्मृती मानधनाने प्रतिक्रिया दिली, ती म्हणाली की, “प्रत्येकाच्या शॉट सिलेक्शनकडे बघितले तर वाटते की आम्ही अधिक चांगले करू शकलो असतो. याबाबत विशेषतः माझ्यापासून सुरुवात झाली. मला वाटते की माझी शॉट सिलेक्शन चांगली असायला हवी होती. आम्हाला प्रति ओव्हर केवळ सहा धावा हव्या होत्या. कदाचित आम्ही सामना पुढे न्यायला हवा होता. मी याची जबाबदारी घेते, कारण मीच विकेट गमावण्याची सुरुवात केली होती.”

स्मृती बाद झाल्यावर तिला असा विश्वास होता की भारत सहज जिंकेल. स्मृती पुढे म्हणाली की, “मला विश्वास होता की मी त्यांचा सामना करू शकेन. मी कव्हरवरून खूप जास्त शॉट्स मारण्याचा प्रयत्नात जास्त होते. मी तो शॉट चुकीचा ठरवला. कदाचित त्यावेळी त्या शॉटची  काही एक आवश्यक नव्हती.”

हेही वाचा : ENG vs NZ : आदिल रशीदच्या फिरकीपुढे न्यूझीलंड बेहाल! इंग्लंडची टी-२० मालिकेत आघाडी

स्मृती पुढे म्हणाली की, “मला फक्त अधिक धीर धरण्याची आवश्यकता होती. संपूर्ण डावात, मी स्वतःला धीर धरायला आणि हवाई शॉट्स खेळू नये असे बाजावून सांगत होते. कदाचित भावना माझ्यावर प्रभावी ठरत हॉट असाव्या, जे क्रिकेटमध्ये कधीही मदत करत नाही. मला विश्वास होता की आपण जिंकू, पण ते क्रिकेट आहे. तुम्ही कधीही खूप पुढे विचार करू शकत नाही,”

Web Title: Womens world cup 2025 smriti mandhana disappointed with defeat against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • ICC Women World Cup 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.