न्यूझीलंड आणि इंग्लंड(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs NZ T20 series : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या विजयात फिरकी गोलंदाज आदिल रशीदने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने आपल्या शानदार कामगिरीने करत चार बळी टिपले आहेत.
आदिल रशीदच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंदाजांच्या फलदाजांची चांगलीच दाणादाण उडाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने एक मजबूत धावसंख्या उभारण्यात यश मिळवले आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत सामना आपल्या खिशात घातला. या विजयासह इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या निर्णय घेत इंग्लंडने २० षटकांत ४ गडी गमावून २३६ धावा उभ्या केल्या. इंग्लंडने ६८ धावांत आपल्या जोस बटलर (४) आणि जेकब बेथेल (२४) यांच्या विकेट गमावल्या. येथून कर्णधार हॅरी ब्रूकने फिल साल्टसोबत तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची मोठी भागीदारी करत इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. हॅरी ब्रूकने ३५ चेंडूत ७८ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले. तर फिल साल्टने ५६ चेंडूंचा सामना करत ८५ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने १ षटकार आणि ११ चौकार लगावले. इंग्लंडकडून काइल जेमीसनने दोन बळी घेतले, तर जेकब बेथेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. या मालिकेतील तिसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर हे दोन्ही देश तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडचा संघ १८ षटकांत सर्वबाद फक्त १७१ धावाच करू शकला. धावसंख्या १८ पर्यंत पोहोचेपर्यंत न्यूझीलंडने त्यांच्या दोन विकेट गामावल्या होत्या. येथून, टिम सेफर्ट (३९) ने मार्क चॅपमनसह तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडून संघाच्या आशा जीवंत केल्या होत्या, परंतु चॅपमन (२८) बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या पट्टीवरून घसरली.
हेही वाचा : IND VS AUS : ना गिल, ना जयस्वाल..! ‘हा’ सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू होणार; ‘हिटमॅन’ शर्माचे भाकीत
दरम्यान, कर्णधार मिचेल सँटनरने १५ चेंडूत ३६ धावांची वादळी खेळी केली, परंतु ती खेळी न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरू शकली नाही. इंग्लंडकडून आदिल रशीदने ४ षटकांत ३२ धावा देत सर्वाधिक ४ बळी टिपले. तर ल्यूक वूड, ब्रायडन कार्स आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.