World Chess Championships : डी गुकेशने गमावली सुवर्णसंधी, चिनी खेळाडूने केला सामना अनिर्णित
World Chess Championship : भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या १३व्या गेममध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. या परिस्थितीचा फायदा घेत डी गुकेश गेम जिंकेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.
डी गुकेश विजयाच्या अगदी दूर, सामना अनिर्णत
🚨 Game 13 Update! 🚨 Another draw as D. Gukesh and Ding Liren finish tied at 6.5 points each in the World Chess Championship. Both players fought hard, but neither could secure a win. The final game will be pivotal—who will take the title? 🏆♟️ #WorldChess2024 #DingLiren… pic.twitter.com/F48Lm13JPb — Doordarshan Sports (@ddsportschannel) December 11, 2024
गतविजेत्या डिंग लिरेनने दबावाखाली केली चमकदार कामगिरी
भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 13व्या गेममध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गुकेशने आपला चिनी प्रतिस्पर्धी डिंग लिरेनवर दबाव कायम ठेवला होता. डी गुकेश या परिस्थितीचा फायदा घेत गेम जिंकेल, अशी आशा बुद्धिबळ तज्ज्ञांना होती. पण असे झाले नाही. गतविजेत्या डिंग लिरेनने दबावाखाली चमकदार कामगिरी करीत सामना अनिर्णित ठेवला. दोन्ही खेळाडूंनी ६९ चालीनंतर बरोबरी साधली. गुकेश आणि लिरेन आता 13 गेमनंतर 6.5-6.5 गुणांसह बरोबरीत आहेत.
बुद्धिबळ स्पर्धेत आता फक्त एकच खेळ शिल्लक
सिंगापूर येथे खेळल्या जाणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आता फक्त एकच खेळ शिल्लक आहे. 14व्या गेममध्ये जो खेळाडू जिंकेल तो वर्ल्ड चॅम्पियन होईल. डिंग लिरेन पांढऱ्या तुकड्यांसह खेळत असेल आणि त्यामुळे थोडा फायदा होऊ शकतो. 14 वा गेम अनिर्णित राहिल्यास चॅम्पियनचा निर्णय टायब्रेकरने होईल.
दोन्ही खेळाडूंमधील वयाचा फरक जवळपास दुप्पट
18 वर्षीय डी गुकेशने 14 वा गेम जिंकला तर तो बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरेल. या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे कारण दोन्ही खेळाडूंमधील वयाचा फरक जवळपास दुप्पट आहे. आतापर्यंतच्या सामन्यांवर नजर टाकली तर ३२ वर्षीय लिरेनने पहिला सामना जिंकला होता. यानंतर गुकेशने तिसरा गेम जिंकून बरोबरी साधली. यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सने सलग सात ड्रॉ खेळले. त्यानंतर भारतीय खेळाडूने 11वा गेम जिंकून 6-5 अशी आघाडी घेतली. पण लिरेनने पुढच्याच गेममध्ये डी गुकेशचा पराभव करून बरोबरी साधली. आता 13व्या गेमनंतरही दोन्ही खेळाडू बरोबरीवर आहेत.






