फोटो सौजन्य - UP Warriorz/Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आज गुजरात जायंट्सला स्पर्धेमध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने स्पर्धेमध्ये कमालीची सुरुवात केली होती पण झालेले मागील दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरतील. महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्थिती चांगली आहे, तर गुजरात जायंट्सची स्थिती खूपच वाईट आहे.
सुरुवातीच्या सलग दोन विजयांनंतर, आरसीबीला मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि सुपर ओव्हरमध्ये षटकात आणि यूपी वॉरियर्स विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या दोन पराभवांनंतर, आरसीबी निश्चितच विजयी मार्गावर परत येऊ इच्छित असेल. दोन्ही संघाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर आरसीबीचा जीजी विरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे . त्यांनी या संघाविरुद्ध पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत, यामध्ये या हंगामातील पहिला सामनाही समाविष्ट आहे. त्याने बेंगळुरूमध्ये या संघाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. सध्या आरसीबीकडे पर्पल आणि ऑरेंज कॅप दोन्ही आहेत.
Round 2 against the Giants. 👊 Back on feet, gunning for the win. 🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2025 #RCBvGG pic.twitter.com/r7yMUsaW4Y — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 27, 2025
तिथेच गुजरात जायंट्सच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे, युपीने महिला प्रीमियर लीग २०२३ आणि २०२४ मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी होती आणि यावेळीही तीच परिस्थिती आहे. ते अॅशले गार्डनर आणि डिएंड्रा डॉटिनवर खूप अवलंबून आहेत. हे दोन्ही खेळाडू गेल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. या वर्षी त्यांचा धावगती (५.७९) सर्वात वाईट राहिली आहे, तर या वर्षी सर्वात कमी आणि सर्वाधिक चौकार (१६ चौकार आणि चार षटकार) मारणारा संघ त्यांचा आहे. या वर्षी पॉवर प्लेमध्ये त्यांनी सर्वाधिक ११ विकेट गमावल्या आहेत. बेथ मुनी फॉर्ममध्ये नाही तर हरलीन देओल ही चांगला खेळ दाखवू शकली नाही.
स्मृती मानधना (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, अॅलिस पेरी, राघवी बिश्त, रिचा घोष (विकेटकिपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, एकता बिश्त, किम गार्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग
बेथ मुनी (विकेटकिपर), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, भारती फुलमाली, दयालन हेमलता, तनुजा कंवर, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.