Yash Dayal's problems increase! Sexual harassment case takes a different turn; Evidence from alleged girlfriend comes to light..
Yash Dayal’s problems increased : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज यश दयाल गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. तो त्याच्या खाजगी आयुष्याने चर्चेत आला आहे. आता त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका मुलीकडून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणात एक नवीन वळण मिळाले आहे.
गाझियाबादच्या इंदिरापुरम येथे राहणाऱ्या एका मुलीने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्या मुलीकडून सोशल मीडियावर क्रिकेटर यश दयालवर उघडपणे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तथापि, नवराष्ट्र या स्क्रीनशॉट व्हायरल होण्याच्या दाव्यांना पुष्टी करत नाही.
हेही वाचा : India vs England सामना रंगणार एजबॅस्टनमध्ये! दुसऱ्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी? वाचा पिच रिपोर्ट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटवरून असे दिसून येत आहे की, ‘मी तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि सर्व काही देवाच्या हातात सोडले, परंतु तुम्ही माझ्यासारख्या मुलींना ज्या प्रकारे फसवत आहात. कदाचित हे आपल्या सर्वांसाठी डोळे उघडणारेया असणार आहे. मला आशा आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल बरेच काही शिकवेल. हे यश नाही, खरे यश नातेसंबंधांमध्ये स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि शुद्धता आणत असते.’या असे शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs ENG : बुमराह Playing 11 मधून बाहेर, कुलदीपचा पण पत्ता कट होणार! या दोन खेळाडूंना मिळणार संधी?
पुढे, मुलीने असे देखील लिहिले की, ‘मुलींबद्दल वापर करा आणि फेकून द्या,या असे कोणतेही धोरण असू शकत नाही. मी बरेच काही सांगू शकते, परंतु आता मला खोलवर जायचे आहे. स्वतःच्या आत. मी कर्मावर विश्वास ठेवत असून मी तुमच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाया आहे, परंतु आता मला कळले आहे. तुमच्यासारख्या लोकांना कर्माच्या दयेवर सोडता येणार नाही, कारण तुम्ही देवाला देखील घाबरत नाही.’ असे त्या मुलीने लिहिले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यश दयाल या विजयाचा महत्वाचा भाग राहिला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये १३ बळी टिपले आहेत. यश दयाल उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो. त्याला अद्याप भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळालेली नाही. परंतु, आता मात्र तो शारीरिक शोषणाच्या आरोपानंतर दयाल आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार, पीडित महिलेकडून आरोप करण्यात आहे की, यश त्यांच्या नात्यादरम्यान अनेक महिलांशी संबंधात राहिला होता.