फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात टीम इंडीयाची संभाव्य प्लेइंग 11 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीला फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. भारताचा संघाचा पहिला कसोटी सामन्यात पराभव झाला पण आज दुसरा कसोटीवर भारतीय संघाची नजर असणार आहे. भारतीय संघाची निवड जेव्हा झाली होती तेव्हा निवडकर्त्यांनी जसप्रीत बुमराह फक्त तीन सामने खेळताना दिसणार आहे असे स्पष्ट केले होते. मीडियाच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह पुढील सामना हा खेळणार नाही असे सांगण्यात आले आहे.
काही रिपोर्टच्या माहितीनुसार कुलदीप यादवला पुढील सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे. पण यासंदर्भात अजूनपर्यंत भारतीय नियामक मंडळा (BCCI) ने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार आता प्लेइंग इलेव्हनमधून कुलदीप यादवचा पत्ता कट झाला आहे. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव हे दोघेही जर संघामधून बाहेर झाले तर या दोघांच्या जागेवर कोणत्या दोन खेळाडूंना स्थान मिळणार या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार त्यात जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर आणि नितेश कुमार रेड्डी या दोघांना संघामध्ये स्थान दिले जाऊ शकते. आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सच्या संघाकडुन वॉशिंग्टन सुंदर हा खेळत होता. शुभमन गिल हा या संघाचा कर्णधार होता त्यानंतर त्याला सुरुवातीच्या सामन्यामध्ये संधी मिळाली नव्हती पण नंतर त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले. नितेश कुमार रेड्डी हा फलंदाजी त्याच बरोबर गोलंदाजी दोन्ही करतो त्यामुळे तो एक चांगला ऑलराऊंडर पर्याय आहे.
India vs England सामना रंगणार एजबॅस्टनमध्ये! दुसऱ्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी? वाचा पिच रिपोर्ट
इंग्लड दौऱ्यात बुमराह संपूर्ण पाच सामने खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे. परंतु जसप्रीत बुमराह मालिकेचा दुसरा सामना खेळणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. सहाय्यक प्रशिक्षकांनी सांगितले आहे की यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर बुमराह निघून गेला तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळेल हे निश्चित आहे. एका सामन्यानंतर संघ व्यवस्थापन मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वगळणार नाही, त्यामुळे हे दोघेही खेळतील हे निश्चित आहे.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, जसप्रीत बुमराह / अर्शदीप सिंग.