फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड दुसऱ्या कसोटी सामन्याची पिच रिपोर्ट : टीम इंडीया इंग्लडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर घाम गाळत आहे. भारताच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात सोशल मिडीयावर भारतीय संघाची फलंदाजी चांगली नाही असे प्रश्न उपस्थित केले जात होते पण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघामध्ये नसताना भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि पहिल्या सामन्याच फलंदाजांनी 5 शतक झळकावले. भारताचा संघ आता दुसऱ्या पराभवाला विसरु इच्छितो, संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय संघ हा रोहित शर्माच्या निवृतीनंतर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर टीम इंडीयाचा उपकर्णधार हा रिषभ पंत असणार आहे. भारताच्या दोन्ही कर्णधार आणि उपकर्णधार यांनी शतक झळकावले. भारतीय संघाची पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी निराशाजनक राहिली. भारतीय संघाच्या हाती लवकर विकेट लागले नाही त्यामुळे संघाच्या हातुन विजय निसटला.
जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते आणि कुलदीप यादवला अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. अर्शदीप सिंग आणि आकाशदीप हे देखील बुमराहच्या जागेसाठी दावेदार आहेत. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. दोन्ही कर्णधार खेळपट्टी आणि हवामानानुसार अंतिम ११ ठरवतील. अशा परिस्थितीत, एजबॅस्टन खेळपट्टीची स्थिती काय असणार आहे ते जाणून घेऊया. तसेच, २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये हवामान कसे असेल.
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरील कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांमध्ये बॅट आणि बॉलमध्ये रोमांचक स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडमध्ये अनेकदा दिसून येते तसे, सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीवर खूप वेग आणि उसळी मिळू शकते. वरच्या फळीतील फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनी वापरलेल्या शिवण हालचाली हाताळणे आव्हानात्मक वाटू शकते. ड्यूक्स बॉल फिरण्याची शक्यता असते, ज्यामुळे सुरुवातीच्या विकेट पडण्याची शक्यता वाढते, विशेषतः जर मैदान ढगाळ असेल तर.
भारताच्या संघासाठी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित खेळणे हे भारतीय संघासाठी आव्हान असणार आहे. भारताचा संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरले. भारताचा युवा खेळाडूंचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिका खेळत आहे, त्यांची फलंदाजी चांगली आहे भारताच्या संघाला गोलंदाजीवर काम करण्याची गरज आहे.