Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

Youth Test : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सुरू असलेल्या युथ टेस्टच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय अंडर-19 संघाने आपली पकड बळकट केली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचे 86 धावांवर 4 विकेट पडलेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 06:24 PM
Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

Follow Us
Follow Us:
  • तन्मन बलोदाची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी
  • भारतीय फलंदाजांचे दमदार कमबॅक
  • भारत मालिकेत 1-0 असा आघाडीवर 
 

ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अनौपचारिक कसोटी मालिकेच्या (Youth Test ) दुसऱ्या सामन्यात इंडिया अंडर-19 ने आपली पकड बळकट केली आहे. आपल्या पहिल्या डावात 315 धावा केल्यानंतर यजमानांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसऱ्या डावात 86 धावांवर 4 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाने 55 धावांची आघाडी आपल्याकडे घेतली आहे.

चार दिवसीय सामन्यातील नाणेफेक गमावत फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात फक्त 174 धावांवर गारद झाला. या संघाने 65 धावांवर आपले 6 विकेट गमावले, ज्यानंतर जॅकब पीत्जने चार्ली हँडरसनसोबत सातव्या विकेटसाठी 70 धावा जोडत संघाची धावसंख्या शतक पार नेली.

 

तन्मय बलोदाच्या 6 विकेट

या डावात चार्ली हँडरसनने सर्वाधिक 37 धावा केल्या, तर नील पटेलने 31 धावांची खेळी केली. त्याशिवाय जॅकब पीत्जने 26 धावा आणि पॅट्रिक सुलिवनने 20 धावांचे योगदान दिले. भारतासाठी तन्मय बलोदाने 32 धावांत 6 विकेट, तर अयान अक्रमने 2 विकेट घेतल्या.

याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 315 धावा केल्या. भारताने 28 धावांवर आपले 2 विकेट गमावले होते, ज्यानंतर कर्णधार यशवर्धन चौहान (52) आणि कुशाग्र ओझा (29) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 63, तसेच मनल चौहान चौहान (34) आणि आर्यन यादवने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली.

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट

अभिप्रायची दमदार फलंदाजी

त्यानंतर अभिप्राय बिस्वासने 13 चौकारांसह 73 धावा, तर प्रियांशु सिंहने नाबाद 30 धावांची खेळी करताना संघाला विशाल धावसंख्येपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्पेंसर ग्रीनने 110 धावा देत 7 विकेट प्राप्त केल्या, तर थॉमस वासेओने 2 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाला आपल्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच धक्का बसला. फक्त 9 धावांवर हेडन बारबुलोविक (9) बाद झाला, त्यानंतर नील पटेल (3) आणि कर्णधार मॅथ्यू लॉफ (8) ही माघारी परतले. त्यानंतर एली ब्रेनने ब्लॅक कॅटलसोबत चौथ्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. ब्रेन 8 चौकारांसह 39 धावा करत बाद झाला. सध्या खेळपट्टीवर ब्लॅक कॅटल (11) आणि झेड हॉलिक (12) टिकून आहेत.

IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया अंडर- 19 ने 26 षटकांचा सामना करताना 4 बाद 86 धावा केल्या. या डावातील सर्व चार विकेट तन्मय (26/4) ने आपल्या नावे केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असे क्लीन स्वीप केल्यानंतर भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव 48 धावांनी आपल्या खिशात घातला होता.

Web Title: Youth test india in strong command of the match rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • BCCI India

संबंधित बातम्या

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं
1

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.