Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबईतील सर्व सामने

WPL 2027 च्या मुंबई लेगमधील सर्व 11 सामने ब्रेबोर्न स्टेडियमऐवजी वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे BCCI ने मैदान बदलण्याचा निर्णय घेतला असून वेळापत्रकात बदल झालेला नाही.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 04:43 PM
WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबई लेगचे सर्व सामने

WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबई लेगचे सर्व सामने

Follow Us
Follow Us:
  • WPLचे वानखेडेकडे प्रथमच यजमानपद
  • सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताच बदल नाही
  • 14 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात
 

विमेंस प्रीमियर लीग (WPL 2027) च्या मुंबईतील सामन्यांच्या स्थळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महत्त्वाचा बदल केला आहे. मुंबईत होणारे सर्व सामने आता ब्रेबोर्न स्टेडियमऐवजी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सामन्यांच्या तारखा आणि वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे प्रथमच वानखेडे स्टेडियमला WPL सामन्यांचे यजमानपद मिळणार आहे.

बीसीसीआयने रविवारी (15 नोव्हेंबर) यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी मुंबईतील सर्व सामने ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार होते. मात्र, आयसीसीच्या आगामी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे मैदानाच्या उपलब्धतेचा आणि खेळपट्टीच्या तयारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मुंबईतील सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे मैदानात बदल

14 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत ब्रेबोर्न स्टेडियम आणि वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. WPL संपल्यानंतर लगेचच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार असल्याने ब्रेबोर्न स्टेडियमवरील खेळपट्टीला पुन्हा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.

आयसीसीच्या नियमानुसार स्पर्धा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी संबंधित मैदानाचा पूर्ण ताबा आयसीसीकडे असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने ब्रेबोर्न स्टेडियमवरील WPL सामने अन्यत्र हलवण्याची विनंती केली होती.

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

त्यानंतर WPL समितीने या बदलाला मंजुरी दिली.

 

वानखेडेवर मुंबईतील सर्व 11 सामने रंगणार

WPL 2027 च्या मुंबई टप्प्यातील एकूण 11 सामने आता वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. यामध्ये साखळी फेरीतील 12व्या ते 20व्या सामन्यांसह एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. हे सामने 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत.

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर

14 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात

WPL 2027 च्या नव्या हंगामाला 14 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दोन वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल. 24 जानेवारीपर्यंत वडोदरा येथे पहिले 11 सामने खेळवले जातील. त्यानंतर स्पर्धा मुंबईत दाखल होईल.

साखळी फेरीतील सामने 3 फेब्रुवारीला संपतील. त्यानंतर 5 फेब्रुवारीला एलिमिनेटरचा सामना होईल. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ थेट 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WPL 2027 चे मुंबईतील सामने कोणत्या मैदानावर होणार आहेत?

    Ans: WPL 2027 च्या मुंबई लेगमधील सर्व 11 सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

  • Que: ब्रेबोर्न स्टेडियमऐवजी वानखेडे स्टेडियमची निवड का करण्यात आली?

    Ans: ब्रेबोर्न स्टेडियमवर 14 फेब्रुवारीपासून महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. खेळपट्टीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि आयसीसीच्या नियमानुसार मैदान उपलब्ध व्हावे, यासाठी हा बदल करण्यात आला.

  • Que: WPL 2027 च्या मुंबई लेगमध्ये किती सामने खेळवले जाणार आहेत?

    Ans: मुंबई लेगमध्ये एकूण 11 सामने होतील. यात साखळी फेरीतील नऊ सामने, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे.

Web Title: Wpl 2027 mumbai leg all 11 matches shifted from brabourne to wankhede stadium rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • BCCI India
  • Mumbai Wankhede Stadium
  • WPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.