Chahal-Dhansharee: The 'that' decision between Yuzvendra Chahal and Dhanashree Verma is set aside by the court, the Bombay High Court will decide..
Chahal-Dhansharee : भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहलबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. त्यांनी घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या होत्या. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केल्याची बातमी पुढे आली आहे. आता 20 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात घटस्फोटावर सुनावणी होणार आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. मीडिया रिपोर्ट्सवर चहल आणि धनश्री लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे राहत होते. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
अधिक माहिती अशी की, दोन वर्षांनंतर म्हणजे 27 सप्टेंबर 2024 रोजी, क्रिकेटर युझवेंद्र चहलकडून धनश्री वर्मासाठी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये त्याने धनश्री वर्माला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून चहलने धनश्री वर्मासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नसल्याचे दिसत आहे. त्यांनी एकमेकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. या सगळ्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अनफॉलो केलेअ आहे.
हेही वाचा : IPL 2025 :अंबाती रायुडूकडून CSK साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ बड्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता..
सध्या चहल आणि धनश्रीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून कौटुंबिक न्यायालयाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण पोटगीशी संबंधित असून आता याबाबत एक अपडेट समोर आली आहे. बार अँड बेंटच्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयात कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी कुलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.
हेही वाचा : IPL 2025 : CSK साठी MS DHONI रचणार इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूच्या स्थानाला धोका..
न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने देखील कौटुंबिक न्यायालयाला सूचना दिल्या आहेत. घटस्फोटाच्या याचिकेवर 20 तारखेपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत निर्णय घेण्यात यावा, असे या निर्देशामध्ये म्हटले आहे, कारण चहलला आयपीएल 2025 मध्ये सहभागी व्हायचे आहे. यापूर्वी, 5 फेब्रुवारी 2025 रोजी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये कूलिंग पिरियड माफ करण्यासाठी याचिकेचा देखील समावेश होता.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.