Zaheer Khan-Sagarika Ghatge: Arrival of a cute baby boy at Zaheer Khan-Sagarika house, 'he' announced a special name...
Zaheer Khan-Sagarika Ghatge : भारतात सध्या आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे. सर्वच खेळाडू आपापल्या संघासाठी महत्वाचे योगदान देता आहेत. अशातच एल गोड बातमी समोर आली आहे. भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी एका गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. झहीर-सागरिका आई-बाबा बनले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. जहीर-सागरिकाला पुत्रप्राप्ती झाली असून त्यांनी तिघांचा एक खास फोटो पोस्ट करत मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे.
सागरिका अआणि झहीरने एक पोस्ट शेयर करुण त्यात लिहिले आहे की, ‘प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे, फतेहसिंह खान याचे स्वागत करत आहोत.’ ब्लॅक अँड व्हाईटमधील 2 फोटो टाकत त्यांनी आपल्या मुलाचे नाव सर्वांना सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये सागरिका-झहीर आणि त्याच्या कुशीत झोपलेला लेक दिसून येत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये नवजात बाळाचं बोट पकडलेला एक क्लोज अप फोटो देखील दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर आणि फोटोवर चाहत्यांकडून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होता आहे, तसेच चाहत्यांकडून लहान बाळाला आशिर्वाद देखील देण्यात येत आहेत.
अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सागरिका घाटगे आणि भारताचा माजी दिग्गज गोलंदाज झहीर खान या दोघांचा प्रेम विवाह झाला आहे. त्यांनी 23 नोव्हेंबर 2017 साली लग्न केले. त्याआधी ते दोघे बराच काळ एकमेकांसोबत डेट करत होते. आता मात्र त्यांच्या घरी या दोघांत तिसऱ्याचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वजण या दोघांचे अभिनंदन करत असून शुभेच्छांचा वर्षाव होता आहे.
हेही वाचा : IPL 2025 वर काळे सावट, एक जण साधतोय खेळाडूंशी जवळीक, भ्रष्टाचार विरोधी पथक सक्रिय, BCCI ने दिला इशारा..
झहीर खान सध्या आयपीएल 2025 मध्ये मग्न आहे. १८ व्या सीझनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलिंग कोच म्हणून भूमिका बजावत आहे. आयपीएल २०२५ मध्ये लखनऊचे आत्तापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात पराजय वाट्याला आला आहे. आयपीएल 2025 मधील आगामी सामना 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे.