फोटो सौजन्य – X (BLACKCAPS)
बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा ९ विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या झिम्बाब्वेचा पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने पहिल्या डावात 307 धावा केल्या आणि 158 धावांची आघाडी घेतली. झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 8 धावांचे लक्ष्य दिले. किवी संघाने 1 विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
पहिल्या डावात झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. कर्णधार क्रेग एर्विनने सर्वाधिक ३९ धावा केल्या. यष्टीरक्षक ताफाड्झवा त्सिगा यांनी ३० आणि निक वेल्च यांनी २७ धावा केल्या. ब्रायन बेनेटने ६, बेन करन १३, शॉन विल्यम्सने २, सिकंदर रझा यांनी २, न्यूमन न्यामुरी यांनी ९, विन्सेंट मासेकेसा यांनी ७ आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी १ धाव केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ६ बळी घेतले. त्याच्याशिवाय नॅथन स्मिथला ३ यश मिळाले.
पहिल्या डावात न्यूझीलंडला दमदार सुरुवात मिळाली. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी ९२ धावा जोडल्या. यंगने अर्धशतक हुकवले आणि ७० चेंडूत ४१ धावा केल्या. हेन्री निकोल्सने ३४ धावा केल्या. रचिन रवींद्रला फक्त २ धावा करता आल्या. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला ८८ धावांवर झेलबाद करण्यात आले. यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलनेही फक्त २ धावा काढल्या. मायकल ब्रेसवेलने ९, कर्णधार मिचेल सँटनरने १९ आणि मॅट हेन्रीने ५ धावा केल्या. डॅरिल मिचेलनेही शतक हुकले आणि तो फक्त ८० धावा करू शकला. ब्लेसिंग मुजराबानीने ३ बळी घेतले. तनाका चिवांगानेही २ बळी घेतले.
दुसऱ्या डावातही झिम्बाब्वेचा एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही. शॉन विल्यम्सने सर्वाधिक ४९ धावा केल्या. ताफाड्झवा त्सिगा यांनी २७ आणि कर्णधार क्रेग एर्विन यांनी २२ धावा केल्या. ब्रायन बेनेटने १८, बेन करन ११, निक वेल्च ४, विन्सेंट मासेकेसा २, सिकंदर रझा ५ आणि न्यूमन न्यामुरी यांनी १ धाव केली. कर्णधार मिचेल सँटनरने ४ बळी घेतले. मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रोर्क यांनी ३-३ बळी घेतले.
We take a 1-nil lead in the two-Test series in Bulawayo. Matt Henry, Player of the Match, claims his second-best Test match figures of 9-90.
Scorecard | https://t.co/lOpzEbMrfi Highlights will be available at Three 📺 #ZIMvNZ #CricketNation 📷 = Zimbabwe Cricket pic.twitter.com/P19RExosaR— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 1, 2025
दुसऱ्या डावात न्यूझीलंडला ८ धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्याच षटकात न्यूमन न्यामुरीने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. त्याने १ चौकाराच्या मदतीने ४ धावा केल्या. हेन्री निकोल्सने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. विल यंग यंग एकही धाव न काढता नाबाद राहिला.