फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या या गरमगरमीच्या मालिकेमध्ये जगभरामध्ये क्रिकेटच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन झाले. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाची मोठी धावसंख्या पहायला मिळाली त्याचबरोबर भारतीय संघाचा संघर्ष देखील पाहायला मिळाला. दोन्ही संघांमधील युवा खेळाडू हे त्यांच्या ताकतीवर खेळत राहिले. सध्या या मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाकडे आघाडी आहे पण या सामन्यात जर भारताचे संघाने विजय मिळवला तर टीम इंडियाला मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी असेल.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील मालिकेच्या शेवटच्या सामन्याचा काल दुसरा दिवस पार पडला आणि या दिवस गोलंदाजांसाठी खास राहिला. आकाशदीप यांनी भारतीय संघासाठी क्रिकेटची सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जॅक क्रॉली याला बाद केले. त्यानंतर जो रूट फलंदाजीला आला होता. यावेळी प्रसिद्ध कृष्णा आणि रूट या दोघांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.
प्रसिद्ध कृष्णा आणि रूट यांच्यामध्ये बाचाबाचा सुरू असताना मैदानावरील पंच धर्मसेना यांनी हस्तक्षेप केला. यावेळी ते प्रसिद्ध कृष्ण याला काहीतरी बोलत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर के एल राहुलचा या प्रकरणासंदर्भातचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
India vs England सामन्यात गोलंदाजांनी केला कहर! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल
प्रसिद्ध कृष्णा आणि रूट यांच्यामध्ये बाचा बाची झाल्यानंतर धर्म सेना हे पंच त्यांना थांबवण्यासाठी आले होते आणि प्रसिद्ध कृष्णाला काहीतरी समजावत होते. त्यानंतर केएल राहुल अंपायरकडे जातो म्हणतो की, ‘तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करावे मैदानावर येऊन? शांत बसावं’. यावर पंच धर्मसेना त्याला सांगतात की, ‘एखादा गोलंदाज येईल आणि तुझ्या अंगावर चढेल असं तुम्ही नाही करू शकत’.
मग यावर राहुल म्हणतो की, ‘मग तुमचं मत काय आहे आम्ही काय करावे? केएल राहुल म्हणतो की आम्ही फक्त इथे येऊन क्रिकेट खेळायचा आणि मग घरी जायचे का? हे संभाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. के एल राहुल हा त्याच्या लहान भावासाठी पुढे आला अशी चर्चा आता सध्या सुरू आली आहे.
दुसरा दिनाच्या खेळाबद्दल सांगायचं झाले तर भारताच्या संघाने इंग्लंडला 247 धावांवर रोखलं. सध्या भारताचा संघ फलंदाजी करत आहे दुसऱ्या दिनाच्या समाप्तीपर्यंत भारताच्या संघाने 75 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 52 धावांची आघाडी घेतली आहे.