
ZIM vs OMA, ICC T20 World Cup: Zimbabwe registers a spectacular victory over Oman! Both the bowlers and batsmen displayed exceptional performance.
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या ८ वा सामना कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात झिम्बाब्वेने शानदार कामगिरी केली आणि ओमानचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ओमानने झिम्बाब्वेसाठी १०४ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे सोपे लक्ष्य झिम्बाब्वेने फक्त १३.३ षटकांत गाठले.
हेही वाचा : ‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video
ओमानने दिलेल्या १०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाची चांगली सुरुवात झाली. पहिल्या तीन षटकांत संघाने ३० धावांचा आकडा गाठला होता. तथापि, चौथ्या षटकात झिम्बाब्वेला सलग दोन विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. ज्यामुळे संघ काही काळासाठी अडचणीत आल्याचे दिसत होते. त्यानंतर मात्र ब्रेंडन टेलर आणि ब्रायन बेनेट यांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाकडे नेले. त्यांच्या भागीदारीने सामना पूर्णपणे झिम्बाब्वेच्या पारड्यात वळवला. परिणामी संघाने झिम्बाब्वेने १४ व्या षटकातच ( टी२० विश्वचषक २०२६ ) लक्ष्य गाठून ८ विकेट्सने विजय मिळवला.
नाणेफेक गामवणाऱ्या ओमानने प्रथम फलंदाजी केली. संघाने २७ धावांच्या आतच पाच विकेट गमावल्या, ज्यामुळे संघावर चांगलाच अडचणीत आला. त्यानंतर विनायक शुक्ला आणि सुफयान महमूद यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावा जोडत संघाचा डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. विनायक शुक्ला यांनी २१ चेंडूत २८ धावा केल्या, तर सुफयान महमूदने ३९ चेंडूत २५ धावा केल्या. नदीम खाननेही २० धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज महत्त्वपूर्ण योगदान देण्यात अपयशी ठरले आणि संघ १९.५ षटकांत १०३ धावांवरच सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर सिकंदर रझाने १ विकेट घेतली
हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, डायोन मायर्स, ब्रेंडन टेलर(विकेटकीपर), सिकंदर रझा(कर्णधार), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी ब्रॅड इव्हान्स,
ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग(कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, जितेन रामानंदी, विनायक शुक्ला(विकेटकीपर), सुफियान मेहमूद, नदीम खान, शाह फैसल, शकील अहमद