स्कॉटलंडने उडवला इटलीचा ७३ धावांनी धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
SCO vs ITA,T20 World Cup 2026 : आज टी२० विश्वचषकामध्ये कोलकाता ईडन गार्डन्सवर स्कॉटलंड आणि इटली यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावा केल्या. तर प्रतिउत्तरात इटलीचा संघ १६.४ षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. परिणामी स्कॉटलंडने टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपला पहिला विजय नोंदवला. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
इटलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ बाद २०७ धावा केल्या, जॉर्ज मुन्से यांनी ५४ चेंडूत ८४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच, ब्रेंडन मॅकमुलन यांनी १८ चेंडूत जलद नाबाद ४१ धावा करून संघाला २०७ धावांपर्यंत पोहोचवले. इटलीकडून अली हसन, थॉमस ड्रेका, ग्रँट स्टीवर्ट आणि जेजे स्मट्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Scotland open their #T20WorldCup account with a comprehensive victory in Kolkata 👏 📝: https://t.co/01Ywp9sRp6 pic.twitter.com/qZtIZsWFFw — ICC (@ICC) February 9, 2026
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या इटली संघाची सुरुवात चांगली झाली नाही. स्कोअर बोर्डवर शून्य धावा असतानाच संघाला पहिल धक्का बसला. जस्टिन मोस्का भोपळा न फोडता बाद झाला. बेन मॅनेंटी आणि हॅरी मॅनेंटी या दोघांनीच चांगली फलंदाजी केली. परंतु, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.हॅरी मॅनेंटी २५ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला तर बेन मॅनेंटीने ३१ चेंडूत ५२ धावा काढल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही. परिणामी संघ १६.४ षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. मायकेल लास्कने उत्कृष्ट कामगिरी करत स्कॉटलंडच्या डावाचे नेतृत्व केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. टी२० विश्वचषकात असोसिएट संघाकडून २०० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर मार्क वॅट २ , ब्रॅड करी, ब्रॅड व्हील आणि ऑलिव्हर डेव्हिडसन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
स्कॉटलंड खेळणारा इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रेंडन मॅकमुलेन रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), मार्क वॅट, मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी
इटली प्लेइंग इलेव्हन: जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, वेन मॅडसेन (कर्णधार), हॅरी मॅनेंटी, बेन मॅनेंटी, जियान मीड (यष्टीरक्षक), ग्रँट स्टीवर्ट, कृष्ण कालुगामेगे, अली हसन, थॉमस ड्रेका






