फोटो सौजन्य – X (Proteas Men)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे पहिला कसोटी सामना : दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामनांच्या कसोटी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या सिरीजसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ झिंबाब्वे दौऱ्यावर असणार आहे या मालिकेत दोन सामने दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून 25 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आयसीसी ट्रॉफी नावावर केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चोकर टॅग हटवला आहे. नव्या सायकलला सुरू करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इलेव्हनची घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ केशव महाराज याच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. या पहिल्या सामन्यात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने २८ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. वर्कलोड व्यवस्थापनाचा भाग म्हणून अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने, संघाने लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि डेवाल्ड ब्रेव्हिस सारख्या तरुण प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली आहे.
१९ वर्षीय प्रिटोरियसने त्याच्या कारकिर्दीत ७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६०.६२ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे क्रिकेट साउथ आफ्रिकेने त्याचा वरिष्ठ संघात समावेश केला आहे. दुसरीकडे, ब्रेव्हिसलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. तो बराच काळ कसोटी संघात आहे, पण त्याला कधीही संधी मिळाली नाही. बांगलादेश मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आले होते, परंतु २२ वर्षीय खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
🚨 TEAM ANNOUNCEMENT 🚨
Captain Keshav Maharaj has confirmed the Starting XI for our Proteas Men ahead of tomorrow’s 1st Test against Zimbabwe 🏏🇿🇦.
A team ready to leave their mark in Bulawayo with flair and firepower 💪🔥.#WozaNawe pic.twitter.com/hvCSd0xkS0
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 27, 2025
कॉर्बिन बॉश आणि वियान मुल्डर हे सलामीची जबाबदारी सांभाळतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रोटीज संघाकडून कोण खेळले. दरम्यान, टेम्बा बामवाच्या अनुपस्थितीत, केशव महाराज सुरु होणाऱ्या मालिकेमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर तीन नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झॉर्झी, विआन मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम, लुआन-ड्रे प्रिटोरियस, देवाल्ड ब्रेव्हिस, काइल वेरेन (विकेटकिपर), कॉर्बिन बॉश, केशव महाराज (कर्णधार), कोडी युसूफ,क्वेना मफाका